Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

लग्नाच्या तीन महिन्यातच झाले श्रद्धा आर्या आणि राहुल नागलमध्ये भांडण, दोघांनीही घेतला ‘हा’ निर्णय

टेलिव्हिजनवरील ‘कुंडली भाग्य’ या मालिकेत प्रीता अरोराची भुमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे श्रद्धा आर्या होय. श्रद्धा सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे. श्रद्धा तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर नेहमीच तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. त्याचबरोबर श्रद्धाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. लग्नानंतरही श्रद्धा आणि राहुल लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. तरीही दोघांमध्ये खूप प्रेम पाहायला मिळत आहे. पण लग्नानंतर केवळ ३ महिन्यांनंतरच राहुल आणि श्रद्धा यांच्यात इतके भांडण होईल आणि ते तीन दिवस एकमेकांशी बोलणार नाहीत, हे कोणालाच वाटले नव्हते. होय, हे अगदी खरे आहे. राहुल आणि श्रद्धा यांच्यात असेच काहीसे घडले आहे.

स्वत: मोहतरमा यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. १६ नोव्हेंबर २०२१ रोजी श्रद्धा (Shraddha Arya) आणि राहुल नागल (Rahul Nagal) विवाहबंधनात अडकले होते. आता श्रद्धाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्यात ती खूप उदास दिसत आहे. इतकंच नाही, तर व्हिडिओमध्ये ती आपल्या पतीला गुपचूप पकडताना दिसत आहे. इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करताना श्रद्धाने एक मजेदार कॅप्शनही लिहिले आहे.

कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मी आणि माझ्या पतीने निर्णय घेतला आहे की, राग आल्यावर आम्ही कधीही बेडवर जाणार नाही.” इतकंच नाही, तर श्रद्धाने पतीसोबत तीन दिवसांपासून भांडण सुरू असल्याचंही सांगितलं आहे. व्हिडिओमध्ये श्रद्धा आर्याचा पती फोनमध्ये व्यस्त दिसत आहे. काही सेकंदात राहुल नागलला कळते की, त्याचा व्हिडिओ बनवला जात आहे. त्यानंतर त्याची प्रतिक्रिया पाहणे बाकी आहे. श्रद्धा आर्या आणि राहुल नागल क्वचितच एकमेकांना भेटतात हे लक्षात घेण्यासारखे आहे. कारण राहुल नौदलाचा अधिकारी आहे.

श्रद्धा आर्या गेल्या अनेक वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीचा एक भाग आहे आणि आज टीव्हीचा एक प्रसिद्ध चेहरा आहे. एकता कपूरच्या ‘कुंडली भाग्य’ फेम शोच्या श्रद्धा आर्याने ‘लक्ष्मी तेरे आंगन की’, ‘तुम्हारी पाखी’, ‘ड्रीम गर्ल’मध्ये काम केले आहे. याशिवाय श्रद्धाने अनेक भाषांमधील चित्रपटांमध्येही काम केले आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा