Tuesday, June 24, 2025
Home मराठी मॉडर्न लूकमध्ये विमानतळावर स्पॉट झालेल्या श्रेया बुगडेच्या पायातील जोडव्यांनी वेधले सर्वांचे लक्ष

मॉडर्न लूकमध्ये विमानतळावर स्पॉट झालेल्या श्रेया बुगडेच्या पायातील जोडव्यांनी वेधले सर्वांचे लक्ष

‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’, हे शब्द बोलत ‘चला हवा येऊ द्या’ या शोने आख्ख्या महाराष्ट्राला पोट धरून हसायला भाग पाडले. इतकेच नव्हे, तर त्यांनी आठवड्यात फक्त दोन दिवसांसाठी प्रेक्षकांच्या भेटीला येऊन, त्यांची मने जिंकण्यात कोणतीही कसर बाकी सोडली नाही. शोच्या या कामगिरीमध्ये, इतर कलाकारांप्रमाणेच अभिनेत्री श्रेया बुगडेचाही मोलाचा वाटा आहे. सुरुवातीपासून ती एकटीच स्त्री या शोमध्ये आहे. पण सगळ्या पुरुष कलाकारांना पुरून उरेल अशी कामगिरी तिने करून दाखवली. विविध कलाकारांची हुबेहुब नक्कल करून तिने प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. श्रेया अधून-मधून सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर करत असते. अशातच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

श्रेयाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती विमानतळावर दिसत आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, श्रेया अगदी स्टायलिश दिसत आहे. फोटोमध्ये तिने निळ्या रंगाची जिन्स आणि पांढऱ्या रंगाचा टॉप घातला असून, यावर तिने जॅकेट घातले आहे. यासोबत तिने केसांची पोनीटेल घालून डोळ्यांवर गॉगल लावला आहे. तसेच तिने हातात हिरव्या रंगाची बॅग घेतली आहे. या फोटोमधील खास गोष्ट म्हणजे या मॉर्डन ड्रेसवर तिने पायात जोडवी घातलेली दिसत आहे. (Actress shreya bugade share her stylish photo on social media)

तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना तर आवडलाच आहे. यासोबत अनेक कलाकारांनी देखील या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या फोटोवर स्पृहा जोशी हिने “ओह” अशी कमेंट केली आहे. स्वप्नील जोशीने “स्वॅग” अशी कमेंट केली आहे, तर अभिज्ञा भावेने “मोहतर्मा कहा चली” अशी कमेंट केली आहे. तसेच बाकी चाहते या फोटोवर कमेंट करत आहेत.

श्रेयाने ‘वाटेवरती काचा गं’ या नाटकाद्वारे अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. तिने ‘तू तिथे मी’ मधून टीव्हीवर पदार्पण केले. त्यानंतर ती ‘फू बाई फू’, ‘माझे मन तुझे झाले’ अशा शोमध्ये दिसली. मात्र, तिला खरी ओळख ‘चला हवा येऊ द्या’ या शोने मिळवून दिली. क्वचितच लोकांना माहिती असेल की, श्रेयाने गुजराती मालिकेमध्येही काम केले आहे. ती ‘छुत्ता छेडा’ या गुजराती मालिकेत झळकली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुखरूप परत ये, लग्न करायचंय’, बेअर ग्रिल्ससोबत ॲडव्हेंचरला निघालेल्या विकी कौशलच्या पोस्टवर चाहत्याची कमेंट

-‘भाईजान’च्या तळपायाची आग मस्तकात! सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्यावर भडकला सलमान, म्हणाला, ‘तू नाचणं…’

-ही दोस्ती तुटायची नाय! आशिष चंचलानीला दिलेले ‘ते’ वचन पूर्ण करण्यासाठी रोहित शेट्टी पोहोचला उल्हासनगरमध्ये

हे देखील वाचा