Tuesday, July 23, 2024

फोटोमधील ‘या’ अभिनेत्रीला ओळखले का? मराठी मनोरंजन मिरवतीये अभिनयाचा डंका

सध्या सोशल मीडियावर एक नवीनच ट्रेंड आला आहे ज्यामध्ये अनेक हिंदी आणि चित्रपट जगतातील अभिनेते आणि अभिनेत्रींचे बालपणीचे फोटो व्हायरल होत आहेत. जे त्यांच्या चाहत्यांनाही ओळखणे कठीण झाले आहे. या व्हायरल फोटोंमध्ये सध्या मालिका आणि चित्रपट जगतात आघाडीवर असलेल्या अनेक अभिनेत्रींच्या बालपणीच्या क्युट अदा पाहायला मिळत आहेत. सध्या असाच एका आघाडीच्या अभिनेत्रीचा बालपणीचा एक फोटो व्हायरल होत आहे. जो कोणालाही ओळखता येत नाही. कोण आहे ही अभिनेत्री, चला जाणून घेऊ. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, सध्या सोशल मीडियावर एका गोंडस आणि क्यूट मुलीचा फोटो व्हायरल होत आहे. झी मराठी मालिका क्षेत्रातील आघाडीची अभिनेत्री असल्याचे सांगितले जात आहे. मात्र हा फोटो पाहून ती अभिनेत्री कोण असावी हे ओळखणे मात्र कठीण झाले आहे. तर ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून चला हवा येऊ द्या मालिकेतील प्रसिद्ध कलाकार श्रेया बुगडे (Shreya Bugde) आहे. श्रेया बुगडेचा हा बालपणीचा क्यूट फोटो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. ज्यामध्ये ती कॅमेऱ्याकडे बघत गोड हसताना दिसत आहे.

दरम्यान श्रेया बुगडे ही प्रसिद्ध कार्यक्रम चला हवा येऊ द्या मधील प्रमुख कलाकार आहे. या कार्यक्रमात भाऊ कदम, कुशल बद्रिके, निलेश साबळे, भारत गणेशपुरे असे अनेक गाजलेले अभिनेते आहेत. मात्र या सगळ्यांच्या गर्दीत श्रेया बुगडेने स्वतःची एक विशेष ओळख निर्माण केली आहे. कसदार सहजसुंदर अभिनय, सोबतीला असलेले घायाळ करणारे सौंदर्य यामुळे श्रेयाने कलाक्षेत्रात आपले भक्कम स्थान निर्माण केले आहे. या मालिकेतील तिच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक होत असते. चला हवा येऊ द्या मालिकेने श्रेया बुगडेला घराघरात प्रसिद्धी मिळाली आहे. श्रेया सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा