Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

यह चाँद सा रोशन चेहरा! श्रुती मराठेचा ग्लॅमरस लूक घालतोय सोशल मीडियावर धुमाकूळ

टेलिव्हिजनवरील ‘राधा ही बावरी’ फेम अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठे होय. श्रुती मराठेने अनेक चित्रपटात आणि मालिकांमध्ये काम करून तिचे नाव घराघरात पोहचवले आहे. ‘राधा ही बावरी’ या मालिकेतील तिचे सरळ साधे आणि सालस पात्र सर्वांच्याच मनात घर करून गेले. पण पडद्यावर सालस दिसणारी श्रुती तिच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र खूपच ग्लॅमरस आहे. अनेकवेळा ती ग्लॅमरस तसेच पारंपारिक पोशाखातील फोटो शेअर करत असते. अशातच तिचा ग्लॅमरस लूक समोर आला आहे.

श्रुतीने नुकतेच सोशल मीडियावर तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला आहे. यावर तिने हेअर सेमी कर्ल करून एक वेगळा लूक दिला आहे. तसेच कानात मोठे रिंग्स घातले आहेत. पायात हाय हिल्स घालून ती रस्त्यावर पोझ देताना दिसत आहे. (Actress Shruti marathe share her glamorous photos on social media)

हे फोटो शेअर करुन तिने लिहिले आहे की, “नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही या जगात अद्वितीय आहे. जसे जगातील इतर लोक आहेत.” तिचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर कमेंट करत आहेत. या फोटोवर ऋतुजा बागवे, सुबोध भावे आणि कादंबरी कदम यांनी कमेंट केल्या आहेत. तसेच तिचे अनेक चाहते देखील या फोटोवर कमेंट करत आहेत.

श्रुती मराठेच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने ‘तप्तपदी’, ‘प्रेमसूत्र’, ‘बंध नायलॉनचे’, ‘अरावण’, ‘शुभमंगल सावधान’, ‘इंदिरा विझा’ ‘सनई चौघडे’, ‘असा मी तसा मी’, ‘रमा माधव’, ‘तुझी माझी लव्ह स्टोरी’, ‘मुंबई पुणे मुंबई २’, ‘स्लॅमबुक’, ‘जागो मोहन प्यारे’ या चित्रपटात आणि मलिकांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रभास अन् पुजा हेगडेचा ‘राधे श्याम’ रिलीझपूर्वीच लीक! ‘अशी’ काहीशी आहे चित्रपटाची कथा

-दहावीत असताना होती पहिली गर्लफ्रेंड, चित्रपटांप्रमाणेच रंगतदार होती कार्तिक आर्यनची लव्हलाईफ

-अरे वा! अखेर ‘देवमाणूस’चा पुढचा भाग येणार प्रेक्षकांच्या भेटीला, सोशल मीडियावर प्रोमो व्हायरल

हे देखील वाचा