Sunday, June 22, 2025
Home साऊथ सिनेमा दाक्षिणात्य अभिनेत्री शुभ्रा अय्यप्पाने बॉयफ्रेंडसोबत गुपचूप केले लग्न, पाहा भन्नाट फाेटाे

दाक्षिणात्य अभिनेत्री शुभ्रा अय्यप्पाने बॉयफ्रेंडसोबत गुपचूप केले लग्न, पाहा भन्नाट फाेटाे

सध्या सिनेसृष्टीत लग्नाचा मोसम सुरू आहे. अनेक जोडपी लग्न बंधनात अडकत आहे. अशातच आता प्रसिद्ध तेलगू अभिनेत्री शुभ्रा अयप्पाने तिच्या आयुष्यातील नवीन प्रवास सुरू केला आहे. शुभ्राने तिचा प्रियकर विशाल शिवप्पासोबत लग्न केले आहे. शुभ्राने विशालसोबत बंगळुरू येथील तिच्या वडिलोपार्जित घरी लग्न केले. आता त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री शुभ्रा (shubra aiyappa) हिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर तिच्या लग्नाची माहिती शेअर केली आहे. 19 जानेवारी 2023 रोजी त्यांचे लग्न झाले. शुभ्राचा पती विशाल शिवप्पा हा बिजनेसमॅन आहे. एकीकडे सेलेब्स शाही विवाहसोहळे आयोजित करत असताना, शुभ्रा आणि विशालने अगदी साध्या पद्धतीने लग्न केले. शुभ्रा आणि विशालचे लग्न इंटीमेट सेरेमनी होती जे पारंपारिक पद्धतीने पार पडली. जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत या दाेघांनी लग्नगाठ बांधली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shubra Aiyappa (@shubra.aiyappa)

शुभ्राने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. यासोबतच तिने एक क्यूट नोटही लिहिली आहे. शुभ्राने लिहिले की, ‘विशाल आणि मी दोड्डामने येथे आमच्या जवळच्या आणि प्रियजनांच्या उपस्थितीत लग्न केले. 150 वर्षांहून अधिक काळापासून त्यांचे हे वडिलोपार्जित घर आहे. या जादुई ठिकाणी आम्ही आमच्या प्रियजनांसोबत प्रेम अनुभवले.’

शुभ्रा आणि विशालचे लग्न पारंपारिक दक्षिण भारतीय संस्कृतीनुसार झाले. शुभ्रा सोनेरी रंगाच्या कांजीवरम साडीत खूपच सुंदर दिसत होती. तिने पारंपारिक दागिने परिधान केले होते आणि तिच्या केसांना चमेलीचे मणी आणि गजरा लावला होता, तर विशालने पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला असून सोनेरी रंगाचा फेटा परिधान केला होता. दोघे एकत्र खूप क्यूट दिसत होते. (actress shubra aiyappa married with businessman vishal sivappa see south actress wedding photos goes viral on internet)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘कष्टाचं चीज व्हायला सुरूवात झाली…’, म्हणत प्राजक्ताने ‘या’ भूमिकेसाठी पुरस्कार मिळाल्याचा व्यक्त केला आनंद

‘गरिबांची सनी लियोनी’, म्हणत नेटकऱ्यांनी केले सई ताम्हणकरला फोटोशूटवरून ट्रोल

हे देखील वाचा