कलाकरांना ग्लॅमर जगात वावरताना आपल्या फिटनेसची खूप जास्त काळजी घ्यावी लागते. त्यास्तही कलाकार विविध प्रकारचे डाएट करतात, जिम, योगाचा आधार घेतात आणि आपला फिटनेस मेंटेन ठेवतात. या इंडस्ट्रीमधील चाळीशी पार केलेल्या अभिनेत्री देखील विशीतल्याच असल्याचे जाणवते. इतका कमालीचा फिटनेस त्या जपतात. आता टेलिव्हिजन स्टार श्वेता तिवारीचेच घ्या. दोन मुलांची आई आणि चाळीशी ओलांडूनही तिने तिचा फिटनेस खूपच उत्तम पद्धतीने राखला आहे. तिची मुलगी आणि ती सोबत असल्या की आई आणि मुलीपेक्षा बहिणी वाटतात असे देखील अनेक लोकं म्हणतात.
View this post on Instagram
टीव्ही इंडस्ट्रीमधील श्वेता एक मोठी आणि टॉपची अभिनेत्री आहे. ती जेवढी तिच्या उत्तम अभिनयासाठी ओळखली जाते, तेवढीच ती तिच्या फिटनेससाठी देखील ओळखली जाते. तिने स्वतःच्या हिंमतीवर या इंडस्ट्रीमध्ये नाव कमावले आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणारी श्वेता सतत तिचे आणि तिच्या मुलांचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. अशातच सध्या तिचा एक व्हिडिओ चांगलाच गाजत असून, टायवरून तिचे खूप कौतुक देखील होत आहे.
नुकताच तिने तिचा एक रील व्हिडिओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती डान्स करताना दिसत आहे. एक उत्तम अभिनेत्री असलेली श्वेता उत्तम डान्सर देखील आहे. तिने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ती ‘नाजनीन’ गाण्यावर डान्स करत आहे. यात तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला असून त्यावर ती काही सॉफ्ट स्टेप्स करत आहे. सोबतच कॅमेऱ्याकडे बघत पोज देखील देत आहे. तिचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून, तिच्या फिटनेसचे, तिच्या सौंदर्याचे सर्वच लोकं कौतुक करताना दिसत आहे.
श्वेताच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर ती सध्या ‘अपराजिता’ या शोमध्ये दिसत आहे. याशिवाय ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील तुफान चर्चेत येते.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘गरिबांची सनी लियोनी’, म्हणत नेटकऱ्यांनी केले सई ताम्हणकरला फोटोशूटवरून ट्रोल
‘…तुझ्या बद्दल मी काय लिहिणार!’, गौरव मोरेंसाठी समीर चौगुले यांनी शेअर केली खास पोस्ट