Thursday, December 12, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘पप्पी दे पारुला’, म्हणत सर्वांना वेड लावणाऱ्या स्मिताने नवीन फोटो केले शेअर; होतोय कौतुकाचा वर्षाव

‘पप्पी दे पप्पी दे पारुला’ असे म्हणत आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे स्मिता गोंदकर होय. अनेक चित्रपटात आणि मालिकांमध्ये स्मिताने काम केले, परंतु ‘बिग बॉस मराठी’ने तिला खरी ओळख दिली. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वामध्ये ती तिसरी रनरअप ठरली होती. या शोमध्ये तिचा स्वभाव, टास्क खेळण्याची पद्धत, तिचा ग्लॅमर आणि डान्स सगळ्यांनीच पाहिला आहे. स्मिता ही अत्यंत ग्लॅमरस अभिनेत्री आहे. ती सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. स्मिता बऱ्याच वेळा ग्लॅमरस अंदाजात दिसत असते. अशातच तिचे काही फोटो समोर आले आहेत.

स्मिताने नुकतेच सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा स्लीव्हलेस शॉर्ट ड्रेस घातला आहे. तसेच केस मोकळे सोडले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने जास्त कोणताही मेकअप केला नाही, तरी देखील तिचे सौंदर्य खुलले आहे. या फोटोमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. (Actress smita gondkar share her morden photos on social media)

हे फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “आयुष्यातील प्रत्येक क्षण एक नवी सुरुवात असते.” तिच्या एका चाहत्याने या फोटोवर “लय भारी दिसतेस,” अशी कमेंट केली आहे. तसेच आणखी एकाने “परम सुंदरी,” अशी कमेंट केली आहे. इतर अनेक चाहते या फोटोवर हार्ट ईमोजी पोस्ट करत आहेत.

स्मिताच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘वॉन्टेड बायको’, ‘येरे येरे पैसा २’, ‘जस्ट गंमत’, ‘मुंबईचा डबेवाला’, ‘गडबड गोंधळ’, ‘माणूस एक माती’, ‘तो आणि मी’, ‘अशी फसली नानाची टांग’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. यासोबत तिने झी मराठीवरील ‘काय घडलं त्या रात्री’ या मालिकेत काम केले आहे. या मालिकेत तिच्यासोबत सुशांत शेलार, जयवंत वाडकर, किशोर कदम, संजय जाधव यांसारखे कलाकार होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मिठीत जाऊन तुझ्या मिटावे…’, स्पृहा जोशीच्या फोटोसोबत कॅप्शननेही वेधले चाहत्यांचे लक्ष

-देखणं रूप! हिरव्या बांगड्या, कपाळावर टिकली अन् पिवळी साडी नेसून राजेश्वरीने दिल्या नवरात्रीच्या शुभेच्छा

-बोल्ड ऍंड ब्यूटीफुल! सई ताम्हणकरच्या हॉटनेसने नेटकरी झाले पुरते वेडे; फोटोवर पडतोय लाईक्सचा पाऊस

हे देखील वाचा