Friday, March 13, 2026
Home बॉलीवूड धक्कादायक! सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडचा ब्रेकअपबद्दल मोठा खुलासा, म्हणाली ‘त्याने मला फसवले आणि…’

धक्कादायक! सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडचा ब्रेकअपबद्दल मोठा खुलासा, म्हणाली ‘त्याने मला फसवले आणि…’

नव्वदच्या दशकात खूपच कमी वयात बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री सोमी अलीने अनेक चित्रपटात काम केले. परंतु ती चर्चेत तेव्हा आली, जेव्हा तिचे नाव बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खानसोबत जोडले गेले. दोघांनीही आपल्या प्रेमाचा स्वीकार केला होता. परंतु काही कारणास्तव त्यांना वेगळे व्हावे लागले होते. नुकतेच सोमीने एका मुलाखतीत तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत आणि चित्रपट कारकीर्दीबद्दल मोकळेपणाने चर्चा केली. तिने सलमान खानसोबतच्या आपल्या ब्रेकअपबद्दलही धक्कादायक खुलासा केला. तिचे वक्तव्य ऐकून तुम्हीही हैराण व्हाल.

१६ वर्षांच्या वयात झाले होते सलमानशी प्रेम
सोमी अली जेव्हा १६ वर्षांची होती, तेव्हा तिने सलमान खानला पहिल्यांदा ‘मैंने प्यार किया’ चित्रपटात पाहिले होते. या चित्रपटानंतर सोमी अली सलमानच्या प्रेमात पडली होती आणि लग्न करण्याचे स्वप्न पाहू लागली होती. तिने आपली बॅग भरली आणि आईला सांगितले की, तिला सलमानसोबत लग्न करण्यासाठी भारतात जायचे आहे. ती भारतात आल्यानंतर सुरुवातीला मॉडेलिंग प्रोजेक्ट आणि चित्रपटानंतर सलमानला भेटली.

सांगितले ब्रेकअपची कहाणी
सलमानसोबत भेट झाल्यानंतर सोमीने १७ वर्षांच्या वयातच सलमानला डेट करण्यास सुरुवात केली होती. दोघांचेही नाते तब्बल ८ वर्षांपर्यंत चालले आणि सन १९९९ मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले. नुकतेच झूम डिजिटलशी बोलताना सोमीने ब्रेकअपची संपूर्ण कहाणी सांगितली आहे.

‘त्याने मला फसवले’
झूमला दिलेल्या मुलाखतीत सोमीने म्हटले, “सलमान खानसोबत ब्रेकअप होऊन २० वर्षे लोटली आहेत. त्याने मला फसवले आणि मी त्याच्यापासून वेगळी झाली आणि परत आले. हे इतकं सोप्पं होतं.” तिने पुढे बोलताना म्हटले की, “आता आम्ही दोघेही आपापल्या आयुष्यात खूप पुढे निघून गेलो आहोत.” सोमीने खुलासा केला की, तिने सलमानशी मागील ५ वर्षे चर्चा केली नाही. सोमीचे म्हणणे आहे की, ब्रेकअपनंतर तिच्याकडे बॉलिवूडमध्ये थांबण्याचे कोणतेही कारण नव्हते.

सैफ अली खान अन् चंकी पांडेसोबत केले काम
त्यांच्यातील नाते संपल्यानंतर ती मियामीला आपल्या होम टाऊनला जाण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्री सांगते की, जेव्हा ती मुंबईत होती, तेव्हा तिने भेट सैफ अली खान आणि चंकी पांडे यांसारख्या चांगल्या कलाकारांसोबत काम केले. पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या सोमीने बॉलिवूडमध्ये ‘कृष्णा अवतार (१९९३)’, ‘अंत (१९९४)’, ‘यार गद्दार (१९९४)’, ‘तीसरा कौन? (१९९४)’ यांसारख्या चित्रपटात काम केले.

पुनरागमन करण्यात नाही रस
सोमीला पुनरागमनाबद्दल विचारले असता ती म्हणाली की, “नाही. मला तेव्हाही रस नव्हता आणि आताही नाहीये. मी तिथे फिट होत नाही.”

चालवते स्वयंसेवी संस्था
‘नो मोर टिअर्स’ नावाची स्वत: ची स्वयंसेवी संस्था चालवत आहे. या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सोमी अली बलात्कार पीडित मुलींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. स्वत: लैंगिक अत्याचाराची शिकार असल्याचे तिने उघड केले आहे. सोमीने एका मुलाखतीत या घटनेबद्दल सांगितले आहे. पीपिंग मूनला दिलेल्या मुलाखतीत तिने कशाप्रकारे तिच्यावर अत्याचार करण्यात आले याबाबद्दल सांगितले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-खबरदारी महत्त्वाची! बीएमसीच्या कारवाईनंतर अभिनेत्री झाली सावध, स्वत: सोबत फोटोग्राफर्सचेही हात केले सॅनिटाईझ

-मोठी बातमी! ड्रग्ज प्रकरणात अभिनेता एजाज खानला एनसीबीने मुंबई विमानतळावर घेतले ताब्यात, ‘या’ टोळीशी संबंध असल्याची शक्यता

-“फोनवर तिचा आवाज ऐकला की हृदय तुटतं” म्हणत सतीश कौशिक झाले आजारी मुलीच्या आठवणीत भावुक

हे देखील वाचा