Monday, February 24, 2025
Home बॉलीवूड सलमान खानसोबतच्या लग्नाच्या अफवांवरून भडकलेली सोनाक्षी सिन्हा, रागाच्या भरात म्हणाली…

सलमान खानसोबतच्या लग्नाच्या अफवांवरून भडकलेली सोनाक्षी सिन्हा, रागाच्या भरात म्हणाली…

गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या लग्नाचे बनावट फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये सलमान खान अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला अंगठी घालत आहे. हा फोटोशॉप केलेला फोटो समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. आता या व्हायरल फोटोंवर अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली आहे.

या फोटोमध्ये सोनाक्षी (Sonakshi Sinha) सलमान खान (Salman Khan) तिला अंगठी घालताला दिसत होता. फोटोमध्ये सोनाक्षीने भांगात सिंदूर लावून वधूसारख्या वेशभुषेत दिसली. त्यानंतर चाहत्यांनी असा अंदाज लावला की, तिने सलमानसोबत गुपचूप लग्न केले होते. मात्र, काही युजर्स हा फोटो खोटे असल्याचेही म्हणाले. आता सोनाक्षी सिन्हाने इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या फोटोवर आपले मौन तोडले आहे आणि प्रतिक्रिया दिली आहे.

सलमानच्या चित्रपटातून केली करिअरला सुरुवात
सोनाक्षी सिन्हाने २०१० मध्ये सलमान खानच्या ‘दबंग’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ज्यामध्ये तिने रज्जोची भूमिका केली होती. या चित्रपटातील सोनाक्षीचे काम आवडले होते. याशिवाय सोनाक्षीने सलमानसोबत ‘दबंग २’ आणि ‘दबंग ३’ मध्येही काम केले आहे. सध्या सोनाक्षी सिन्हा तिच्या ‘डबल एक्सएल’ या नवीन चित्रपटामुळे चर्चेत आहे ज्यामध्ये ती हुमा कुरेशीसोबत दिसणार आहे.

फेक फोटोवर सोनाक्षी सिन्हा काय म्हणाली?
एका पोस्टवर प्रतिक्रिया देताना सोनाक्षी सिन्हाने लिहिले की, “तू मूर्ख आहेस का जो खरा आणि फोटोशॉप केलेल्या फोटोंमध्ये फरक समजू शकत नाही.” सोनाक्षी सिन्हानेही तिच्या या कमेंटने हसणारा इमोजी बनवला आहे. आता सोनाक्षीची प्रतिक्रिया आली आहे. मात्र या फेक फोटोवर सलमान खानकडून अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही.

सोनाक्षी सिन्हाने २०१० मध्ये ‘दबंग’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात ती सलमान खानसोबत दिसली होती. त्यानंतर तिने ‘राउडी राठौर’, ‘सन ऑफ सरदार’, ‘दबंग २’, ‘हॉलिडे: अ सोल्जर इज नेव्हर ऑफ ड्युटी’, ‘लुटेरा’, ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा’, ‘आर राजकुमार’, ‘ऍक्शन जॅक्सन’, ‘कलंक’, ‘मिशन मंगल’, ‘दबंग ३’ आणि ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ सारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.

सलमान खान वर्कफ्रंट
सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर सध्या तो ‘टायगर ३’ च्या चर्चेत आहे. ज्यामध्ये तो एकदा कॅटरिना कैफसोबत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर शेअर करण्यात आला ज्याला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट २१ एप्रिल २०२३ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याशिवाय सलमान खानकडे ‘किक २’ आणि ‘कभी ईद कभी दिवाली’ सारखे चित्रपट आहेत. जे एकामागून एक चित्रपटगृहात दाखल होतील.

हेही वाचा –

हे देखील वाचा