Monday, July 1, 2024

‘बचपन का प्यार’ गाण्यावर थिरकल्या सोनाली कुलकर्णी अन् प्रार्थना बेहेरे, पाहायला मिळाली मजेदार केमिस्ट्री

सध्या सोशल मीडियावर एका गाण्याचा चांगलाच दबदबा दिसून येत आहे. जे गाणे आज प्रत्येकाच्या ओठावर आहे, ते म्हणजे ‘बचपण का प्यार’ होय. या गाण्याने सध्या सर्वांना वेड लावले आहे. अनेक स्टार देखील या गाण्यावर थिरकताना दिसले आहेत. या गाण्यावरील रील्स सध्या इंस्टग्रामवर व्हायरल होत आहेत. अनेक हिंदी तसेच मराठी कलाकारांनी या गाण्यावर रील्स तयार केले आहेत. अशातच मराठी चित्रपट सृष्टीतील दोन आघाडीच्या नायिका सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहेरे यांनी या गाण्यावर एका व्हिडिओ शेअर केला आहे. जो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एका व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती सुरुवातीला तिच्या एका मैत्रिणीसोबत ‘बचपण का प्यार’ या गाण्यावर डान्स करत असते. तितक्यात तिथे प्रार्थना बेहेरे येते, ती त्या मैत्रिणीला बाजूला सारते आणि सोनालीसोबत डान्स करू लागते. नंतर पुन्हा त्या तिघी एकत्र डान्स करताना दिसत आहे. त्यांचा हा मजेशीर व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सोनालीने आकाशी रंगाचा शॉर्ट ड्रेस तसेच शूज घातले आहेत. तर प्रार्थनाने पिवळ्या रंगाचा टॉप आणि स्कर्ट परिधान केला आहे. तसेच तिने पेन्सिल हिल्स घातले आहेत. त्यांचा हा व्हिडिओ त्यांच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे. अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करत आहेत.

काही दिवसांपूर्वी एका लहान मुलाच्या आवाजात ‘बचपण का प्यार’ हे गाणे व्हायरल झाले होते. त्यानंतर या मुलाचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. एवढंच नाहीतर या मुलाचा सत्कार देखील झाला. तर ‘इंडियन आयडल’ या शोमध्ये त्याला बोलावले होते. (sonalee kulkarni and prarthan behere’s dance video viral on social media)

सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहेरे या दोघींनी ‘मितवा’ या चित्रपटात काम केले आहे. त्यांचा हा चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटात त्यांच्यासोबत स्वप्नील जोशी होता. प्रार्थना बेहेरे ही लवकरच झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत दिसणार आहे, तर सोनाली कुलकर्णीने नुकतेच तिचा आगामी चित्रपट ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Shershaah: ‘आम्हाला माधुरी दीक्षित द्या आम्ही निघून जातो’; पाकिस्तानींच्या या मागणीवर विक्रम बत्रा यांनी दिले होते भन्नाट उत्तर

-भुज: द प्राईड ऑफ इंडिया: अजय देवगणला मोठा झटका, चित्रपट झाला ऑनलाईन लीक

-कोण आहेत शहिद कॅप्टन विक्रम बात्रांच्या प्रेयसी डिंपल, का आहेत आजही अविवाहीत?

हे देखील वाचा