Tuesday, July 9, 2024

‘नवऱ्याचं रात्री चंद्राबरोबर दर्शन होईल’, म्हणणारी सोनाली करवाचौथसाठी पोहचली दुबईत

आपला भारत हा विविध सणांनी परिपूर्ण असलेला देश आहे. प्रत्येक सणाला खास महत्व आहे. अशातच रविवारी (२४ ऑक्टोबर) सर्वत्र करवाचौथ हा सण साजरा होत आहे. या दिवशी सगळ्या विवाहित महिला त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी निर्जळी व्रत करतात. हे व्रत त्या सूर्योदयापासून ते चंद्रोदयापर्यंत करतात. चंद्रोदय होताच चंद्राला आणि त्यांच्या पतीला बघून त्या त्यांच्या पतीच्या हाताने हे व्रत सोडतात. मनोरंजन क्षेत्रात देखील करवाचौथ हा सण मोठ्या उत्साहाने साजरा होताना दिसत आहे. अनेक अभिनेत्रींनी करवाचौथनिमित्त काही विशेष फोटो शेअर केले आहेत. अशातच अप्सरा सोनाली कुलकर्णीने देखील पतीसोबत एक खास फोटो शेअर केला आहे.

सोनालीने नुकतेच सोशल मीडियावर तिचा पती कुणाल बेनोडकरसोबत एक सुंदर फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघेही खूप सुंदर दिसत आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, सोनालीने सुंदर लाल रंगाची साडी नेसली असून,  यावर लाल रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज घातला आहे. यासोबत तिने सगळा साजशृंगार केलेला दिसत आहे. तसेच कुणालने देखील पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि त्यावर लाल रंगाचे जॅकेट घातलेले दिसत आहे. (Actress sonalee Kulkarni share a karwa chauth special photo with her husband)

हा सुंदर फोटो शेअर करून तिने कॅप्शन‌ दिले आहे की, “आज आमची पहिली करवाचौथ आहे. मी मुंबईहून दुबईत पोहचले आहे. नवऱ्याचं रात्री चंद्राबरोबर दर्शन होईल याची खात्री आहे.” त्यांचा हा फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “नजर काढा दोघांची.” आणखी एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “जोडी असावी ते अशी लक्ष्मी नारायणासारखी.” एका चाहत्याने “आलं का दाजी आमचं” अशी कमेंट केली आहे.

सोनालीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, सोनाली एक उत्कृष्ट अभिनेत्री आणि डान्सर देखील आहे. तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने तिच्या करिअरमध्ये ‘मितवा’, ‘नटरंग’, ‘हिरकणी’, ‘ग्रँड मस्ती’, ‘पोस्टर गर्ल’, ‘क्लासमेट’, ‘धुरळा’, ‘हंपी’, ‘शटर’, ‘अजिंठा’, ‘ती आणि ती’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘मस्ती’, सिंघम रिटर्न्स’ यांसारख्या अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. यासोबतच ती लवकरच ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर तिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

राज कुंद्रा अन् शिल्पा शेट्टीचा सुरूये वाद? पतीशिवाय अभिनेत्री गेली कौटुंबिक ट्रिपला

गुलाबी साडीत कमाल दिसतेय रिंकू, अभिनेत्रीच्या पारंपारिक लूकने वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके

सेटवरील गोळीबारात झालेल्या मृत्यूमुळे प्रियांका झालीय दुःखी, आपल्या भावना शेअर करत म्हणाली…

हे देखील वाचा