Friday, July 5, 2024

कॅन्सरवर मात केल्यानंतर सोनाली बेंद्रेने दिली रुग्णालयाला भेट, म्हणाली ‘मला रुग्णांना सांगायच आहे की…’

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. बॉलीवूड जगतात प्रदीर्घ काळ अधिराज्य गाजवणारी ही अभिनेत्री काही काळ अतिशय वाईट टप्प्यातून गेली. 2018 मध्ये सोनालीला हाय ग्रेड कॅन्सर झाल्याचे निदान झाले. याबाबत माहिती मिळताच तिच्यावर उपचार सुरू झाले असून ती आता बरी झाली आहे. अलीकडेच अभिनेत्रीने कर्करोगावर उपचार घेतलेल्या हॉस्पिटलला भेट दिली आणि तिचा जुना प्रवास आठवला. यावेळी सोनाली चांगलीच भावूक झालेली पाहायला मिळाली. 

सोनाली बेंद्रे ही हिंदी सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने तिने सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अलिकडेच सोनालीला कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. याबद्दलच्या आठवणी तिने सोशल मीडियावरुन शेअर केली आहे. सोनाली बेंद्रेने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने हॉस्पिटलला भेट दिली आहे. क्लिपमध्ये तिचा पती गोल्डी बहल आणि सोनाली हॉस्पिटलमध्ये बसलेला फोटो आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonali Bendre (@iamsonalibendre)

 

याबद्दल सोनाली बेंद्रेने बोलताना  “चार वर्षांनंतर.ही खुर्ची.हे दृश्य.ही तीच जागा आहे. एका मोठ्या भीतीपासून ते सततच्या आशेपर्यंत, बरेच काही बदलले आहे तरीही बरेच काही समान आहे. तिथे बसून रुग्णांना आत जाताना पाहणे अवास्तव होते… आणि मी त्यांच्यासारखाच प्रवास करत असल्याचे मला दिसत होते. केमोथेरपी सूट. एकच वेटिंग रूम, फक्त वेगवेगळे चेहरे. मला वाटले की त्या रूग्णांना सांगावे की अजून एक आशेचा किरण आहे. माझ्याकडे बघा, मी त्या प्रवासातून बाहेर पडले आणि इथपर्यंत पोहोचले,”

याबद्दल सांगताना सोनाली पुढे लिहते की “तुम्ही अंदाज लावू शकता की हा कटू आठवणींनी भरलेला एक भावनिक दिवस होता. पण मी बाहेर पडले, माझ्या मुलाच्या डोळ्यात पाहिले आणि सर्व गोष्टींसाठी देवाचे आभार मानले,” सध्या तिची ही भावूक पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.

हे देखील वाचा