Tuesday, July 9, 2024

‘कभी नीम नीम, कभी शहद शहद’, म्हणत सोनाली कुलकर्णीने केले रंगीबेरंगी साडीतील फोटो शेअर

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अशा खूप कमी अभिनेत्री आहेत. ज्यांनी मराठीसोबत इतर अनेक भाषांमध्ये त्यांच्या अभिनयाचा डंका मिरवला आहे. अगदी हिंदीपासून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत त्यांनी त्यांची ओळख निर्माण केली आहे. यातीलच एक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी होय. सोनाली कुलकर्णी ही चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावान अभिनेत्री आहे.

अभिनयाच्या आणि डान्सच्या जोरावर तिने केवळ तिचे नावलौकिक मिळवले नाही, तर लाखो प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे. आपल्या साध्या आणि सालस रूपाने समोरच्याचे मन जिंकण्यात ती कधीही कमी पडत नाही. त्यात तिचे संवाद कौशल्य तर वाखडण्याजोगे आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच तिची एक पोस्ट समोर आली आहे. (actress sonali kulkarni share her colourful saree photos on social media)

सोनाली कुलकर्णीने इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केला आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने रंगीबेरंगी साडी परिधान केली आहे. तिच्या या साडीमध्ये लाल, पिवळा, जांभळा, हिरवा, केशरी असे वेग वेगळे रंग आहेत. या साडीवर तिने आकाशी रंगाचा स्लिव्हलेस ब्लाऊज घातला आहे. तसेच गळ्यात ज्वेलरी घातली आहे. या साडीमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देत आहेत.

हे फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “कभी नीम नीम, कभी शहद शहद.” तिच्या या फोटोवर अनेक चाहते कमेंट करत आहेत. एका चाहत्याने कमेंट केली आहे की, “इस खूबसूरती का मैं दीवाना हो गया.” तसेच बाकी अनेक चाहते या फोटोवर कमेंट करत आहेत.

सोनालीला मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले आहे. तिने ‘कैरी’, ‘मिशन काश्मीर’, ‘डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर’, ‘सायलेन्स प्लीज द ड्रेसिंग रूम’, ‘लव्ह इज ब्लाइंड’, ‘सखी सिर्फ’, ‘गंध’, ‘मोहनदास’, ‘लव्ह खिचडी’, ‘सिंघम’, ‘देऊळ’, ‘डॉक्टर प्रकाश बाबा आमटे’, ‘अगंबाई अरेच्चा २’, ‘कच्चा लिंबू’, ‘गुलाबजाम’ आणि ‘डॉक्टर काशिनाथ घाणेकर’, ‘भारत’, ‘तुफान’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे.

हेही वाचा :

डिपनेक लाँग गाऊनमध्ये खुलले माधवी निमकरचे सौंदर्य, नवीन फोटो आले चर्चेत

आनंद शिंदे यांनी मीरा आणि जय यांना दिली गाण्याची ऑफर, आगामी काळात झळकणार एकत्र

‘भाऊने माझा केसाने गळा कापला असता’, म्हणत कुशल बद्रिकेने शेअर केला भाऊ कदमसोबतचा ‘तो’ किस्सा

 

हे देखील वाचा