अनेक अभिनेत्रींनी 90च्या दशकात बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले, त्यापैकी काहींनी यशाचे शिखर गाठले तर काही चंदेरी दुनियेमध्ये कुठेतरी हलवल्या. अशीच एक अभिनेत्री म्हणजे सोनम. साेनमचे खरे नाव बख्तावर खान आहे. सोनम जेव्हा 14 वर्षांची होती, तेव्हा तिने बॉलिवूडमध्ये आपल्या करिअरची सुरुवात ‘विजय’ या चित्रपटातून केली होती. मात्र, तिला तिच्या चित्रपट कारकिर्दीत सर्वाधिक प्रसिद्धी ‘त्रिदेव’ या चित्रपटातून मिळाली.
सोनम 1991मध्ये अडकली लग्नबंधनात
त्रिदेव(Tridev) चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सोनम (Sonam Bakhtawar Khan) आणि चित्रपटाचे दिग्दर्शक राजीव राय (Rajiv rai) यांची जवळीक वाढली. दोघांनी जवळपास तीन वर्षे एकमेकांना डेट केले आणि त्यानंतर 1991मध्ये लग्न बंधनात अडकले. लग्नाच्या वेळी सोनम फक्त 19 वर्षांची होती तर राजीव हे तिच्यापेक्षा 17 वर्षांनी मोठा होते. सोनमने तिच्या फिल्मी करिअरमध्ये जवळपास 25 चित्रपट केले आणि त्यानंतर सिनेसृष्टीला अलविदा केले.
सोनम 1994मध्ये चित्रपट साेडून गेली पदरेशात
सण 1994 मध्ये प्रदर्शित झालेला ‘इन्सानियत’ हा तिचा शेवटचा चित्रपट होता आणि त्याच वर्षी तिचे पती राजीव यांच्यावर त्यांच्या कार्यालयाबाहेर अंडरवर्ल्डचा हल्ला झाला होता. या हल्ल्यात राजीव यांचे प्राण वाचले होते. या घटनेनंतर राजीवने देश सोडला आणि ते परदेशात स्थायिक झाले होते. सोनमही चित्रपट सोडून त्याच्यांसोबत परदेशात गेली.
सण 2016मध्ये घेतला घटस्फाेट
सोनम आजही त्रिदेव चित्रपटातील ‘ओये ओये’ या गाण्यासाठी ओळखली जाते. या गाण्यानंतर तिला ओये ओये गर्ल म्हटले गेले. त्यावेळी चाहत्यांमध्ये साेनमची क्रेझ प्रचंड वाढली हाेती. मात्र, सोनमने तिच्या वैयक्तिक आयुष्यात एक वाईट टप्पा पाहिला जेव्हा तिचे पती राजीवसोबतचे लग्न टिकले नाही. दोघेही लग्नाच्या 25 वर्षांनंतर एकमेकाच्या संमतीने वेगळे झाले आणि 2016मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर सोनमने पुद्दुचेरी येथील रहिवासी असलेल्या डॉ. मुरली पोदुवाल यांच्याशी लग्न केले.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भिकाऱ्यांना अन्न देण्यासाठी भिकारी बनून जायचा सलमान; अभिनेत्री म्हणाली, ‘मुंबईच्या रस्त्यांवर…’
‘शिव ठाकरे निर्लज्ज’, म्हणत बिग बॉसच्या घरात ढसाढसा रडली ‘ही’ अभिनेत्री