Thursday, January 29, 2026
Home बॉलीवूड साेनमचा मुलाला स्तनपान करतानाचा व्हिडिओ व्हायरल, जाणून घ्या चाहते का करत आहेत काैतुक

साेनमचा मुलाला स्तनपान करतानाचा व्हिडिओ व्हायरल, जाणून घ्या चाहते का करत आहेत काैतुक

बॉलीवूडची लाेकप्रिय अभिनेत्री सोनम कपूर तिच्या लूक आणि ड्रेसिंग सेन्ससाठी ओळखली जाते. सध्या सोनम मदरहुडचा आनंद घेत आहे. सोनम आणि तिचा नवरा सध्या आपल्या मुलासोबत चांगला वेळ घालवत आहेत. दरम्यान, सोनमचा तिच्या मुलासोबतचा एक व्हिडिओ साेशल मीडियावर प्रंचड व्हायरल हाेत आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीच्या मल्टीटास्किंग कौशल्याने लोक खूपच प्रभावित झाल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून चाहते व्हिडिओवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहे.

स्तनपान करताना अभिनेत्रीने केला मेकअप 
या व्हिडिओमध्ये साेनम कपूर (sonam kapoor) मेकअप रुममध्ये आहे. साेनम मेकअप करताना तिचा मुलागा वायू याला दूध पाजत आहे.  व्हिडिओमध्ये अभिनेत्री स्तनपानानंतर लेहेंगा आणि ज्वेलरी परिधान करताना दिसत आहे. अभिनेत्रीचा हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. यावरून ती आपल्या मुलाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडत असल्याचे स्पष्ट होते. व्हिडिओ शेअर करताना सोनम कपूरने लिहिले की, “माझ्या टीमसोबत खऱ्या जगातील लोकांना भेटून आनंद झाला. आपल्या होम ग्राउंडवर परत येणं खूप छान आहे. लव्ह यू मुंबई.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonam Kapoor Ahuja (@sonamkapoor)

सोनमने केला नाही करवा चौथ साजरा 
संपूर्ण बॉलिवूडमध्ये करवा चौथ साजरी होत असताना सोनम कपूरने हा उपवास केला नाही. एक लांबलचक पोस्ट शेअर करत सोनमने यामागचं मोठं कारण सांगितलं आहे. सोनमने इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर करताना सांगितले की, “तिच्या पतीला हे सर्व आवडत नाही.” या पोस्टमध्ये तिने लिहिले की, “माझे पती आनंद आहुजा करवा चौथ व्रताचे चाहते नाहीत. म्हणूनच मी हा व्रत ठेवला नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonam Kapoor Ahuja (@sonamkapoor)

मुलासोबत घालवतेय खास क्षण 
सोनम कपूरने 20 ऑगस्टला मुलाला जन्म दिला. सोनम आणि आनंद आहुजाने त्यांच्या मुलाचे नाव वायू ठेवले आहे. सध्या सोनम तिच्या मदरहुडचा आनंद घेत आहे. मुलाच्या जन्मानंतर त्यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. त्याचबरोबर त्यांच्या मुलाचे अनेक फोटो समोर आले आहेत, मात्र आतापर्यंत मुलाचा चेहरा पूर्णपणे दिसला नाही.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
अभिनेत्री श्रिया सरनने सगळ्यांसमाेर रशियन खेळाडूला केले किस, व्हिडिओ तुफान व्हायरल

‘हिला श्रीलंकेला पाठवा परत’, जॅकलिनच्या व्हिडिओवर संतापले चाहते

हे देखील वाचा