Saturday, July 6, 2024

खुल्लम खुल्ला प्रेम! सोनमने पती आनंदसोबत केली नवीन वर्षाची रोमँटिक सुरुवात, फोटो पाहिला का?

प्रसिद्ध अभिनेत्री सोनम कपूर चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, असे असले तरीही ती चर्चेत राहण्याची एकही संधी सोडत नाही. सध्या ती आपला पती आणि व्यावसायिक आनंद आहुजासोबत क्वालिटी टाईम घालवत आहे. अभिनयाव्यतिरिक्त सोनम सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. आपले नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करून ती चाहत्यांसोबत संवाद साधते. विशेष म्हणजे तिचे पतीसोबतचे फोटो चांगलेच चर्चेत असतात. सोनमने २०२२ या वर्षाचे स्वागत खास अंदाजात केले आहे. यादरम्यान ती आपल्या पतीसोबत रोमँटिक झालेली दिसली. तिचे पतीसोबतचे रोमँटिक फोटो जोरदार व्हायरल होत आहेत.

दिग्गज अभिनेते अनिल कपूर (Anil Kapoor) यांची लाडकी सोनम कपूर (Sonam Kapoor) तिचा पती आनंद आहुजावर (Anand Ahuja) खूप प्रेम करते. हे प्रेम तिने सोशल मीडियावर अनेकदा व्यक्त केले आहे. सोनमने नवीन वर्षाचे रोमँटिक पद्धतीने स्वागत केले आणि २०२१ हे वर्ष अतिशय संस्मरणीय पद्धतीने सांगितले. सोनमने आनंदसोबत लिपलॉक करून नवीन वर्षाचे जोरदार स्वागत केले.

सोनमने अनेक फोटो शेअर केले आहेत. यातील काही फोटो तिच्या रोमँटिक कँडल लाईट डिनरचे आहेत. फोटोत या जोडप्याने काळ्या रंगाचे आऊटफिट परिधान केले आहे. सोनमने ड्रेससोबत डायमंड ज्वेलरी परिधान केली आहे.

अभिनेत्रीने फोटोला कॅप्शन देत लिहिले की, “माझ्या आयुष्यातील प्रेमाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा. ती फक्त #EveryDefemomina नाही, ती दरवर्षी आश्चर्यकारक आहे आणि ज्या व्यक्तीसोबत मला प्रत्येक नवीन वर्ष घालवायचे आहे. २०२२ मध्ये तुम्हा सर्वांना चांगले आरोग्य आणि आनंदासाठी खूप खूप शुभेच्छा.”

सोनम कपूरची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. नेटकरी या पोस्टवर कमेंट करत त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. सोनम फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यासोबतच सोशल मीडियावर प्रत्येक मुद्द्यावर आपले मतही मांडते.

सोनमने २००७ साली आलेल्या ‘सांवरिया’ या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता रणबीर कपूरही मुख्य भूमिकेत होता.

हेही वाचा-

हेही पाहा-

हे देखील वाचा