बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करण्यापूर्वी अनेक कामे केली आहेत. अशीच एक अभिनेत्री आहे जिने अभिनयाच्या जगात येण्यापूर्वी वयाच्या १५ व्या वर्षी काम करायला सुरुवात केली होती. ही अभिनेत्री एका सुपरस्टारची मुलगी असून तिने आता इंडस्ट्रीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत ती सोनम कपूर आहे. अभिनयाच्या जगात येण्यापूर्वी सोनम वेट्रेस म्हणून काम करत होती. खुद्द सोनमनेच एकदा याबाबत खुलासा केला होता.
सोनमने एका मुलाखतीत सांगितले होते की, वयाच्या १५ व्या वर्षी सिंगापूरमध्ये शिकत असताना ती एका चायनीज रेस्टॉरंटमध्ये वेट्रेस म्हणून काम करत होती.
बॉलीवूडमध्ये येण्यापूर्वी सोनम कपूरने सिंगापूर येथील युनायटेड वर्ल्ड कॉलेज ऑफ साउथ-ईस्ट एशियामध्ये थिएटर आणि आर्ट्सचे शिक्षण घेतले. शिक्षणानंतरच त्यांनी अभिनयाच्या जगात प्रवेश केला. सिंगापूरमध्ये तिच्या पॉकेटमनीसाठी सोनम एका चायनीज रेस्टॉरंटमध्ये वेट्रेस म्हणून काम करत होती.
सोनम कपूरने ‘ब्लॅक’ चित्रपटात संजय लीला भन्साळी यांना असिस्ट करून तिच्या प्रवासाला सुरुवात केली. ‘ब्लॅक’मध्ये अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत दिसले होते. सहाय्यक दिग्दर्शक झाल्यानंतर सोनमने संजय लीला भन्साळी यांच्या ‘सावरिया’ या चित्रपटातून पदार्पण केले. या चित्रपटात सोनमसोबत रणबीर कपूर मुख्य भूमिकेत दिसला होता. ‘सावरिया’नंतर सोनमने ‘नीरजा’, ‘वीरे दी वेडिंग’, ‘आयशा’, ‘एक लडकी को देखा तो ऐसा लगा’, ‘संजू’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
लग्नानंतर सोनमने आता अभिनयापासून काहीसे अंतर ठेवले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. सध्या ती तिचा मुलगा वायुच्या संगोपनात व्यस्त आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
रावण दहन कार्यक्रमात जाणार सिंघम अगेनची टीम; पहा कुठे करणार कार्यक्रम साजरा…