Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

पतौडी पॅलेसमध्ये आई शर्मिला यांच्यासह वेळ घालवतेय सोहा; तीन पिढ्यांचा उल्लेख करत फोटो केला शेअर

बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान सध्या चित्रपटांपासून दूर आहे. परंतु ती आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आपल्या आयुष्यातील वेगवेगळे प्रसंग, आठवणी ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते. सध्या ती आपल्या कुटुंबाबरोबर सुट्टी एन्जॉय करत आहे. तेथील मौज मजेचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यामध्ये तिने तिच्या तीन पिढ्यांचा उल्लेख केला आहे.

या फोटोमध्ये सोहा तिची मुलगी इनाया आणि आई शर्मिला टागोर यांच्यासह सुट्टी एन्जॉय करताना दिसली. तिने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये त्या तिघी देखील खूप सुंदर दिसत आहेत. त्यांनी यामध्ये जयपुरी कॉटन प्रिंटचे कपडे घातले आहेत. हे फोटो पतौडी पॅलेसमधील आहेत. त्यांच्या या फोटोंवर चाहते खूप हार्ट इमोजी पाठवत आहेत. हा फोटो शेअर करत सोहाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “तीन पिढ्यांमधील महिला.” सोहा तिची मुलगी आणि आई अशा तिघी जणी या फोटोमध्ये असल्याने तिने असे कॅप्शन लिहिले आहे.

तिने पोस्ट केलेल्या या फोटोवर श्वेता बच्चनने प्रतिक्रिया देत कमेंटमध्ये लिहिले आहे की, “हे किती अद्भुत आहे.” तसेच सोहाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्टोरीमध्ये एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. यामध्ये ती स्क्रॅबल हा एक मजेशीर खेळ खेळताना दिसत आहेत. या खेळामध्ये शर्मिला यांना २५८ अंक मिळतात, तर सोहाला फक्त १० अंक मिळतात आणि ती हारते असे दिसत आहे.

यासह सोहाने आणखी एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये इनाया स्टडी टेबलवर बसलेली दिसत आहे. हा फोटो शेअर करत तिने लिहिले की, “इनाया तिच्या बाबांना एक पत्र लिहीत आहे.” साल २०१५ मध्ये सोहाने कुणाल खेमू बरोबर विवाह केला.

नातू जहांगीरला नाही भेटल्या शर्मिला
मुलगा सैफ अली खान आणि सून करीना कपूर यांच्याकडून शर्मिला पाचव्यांदा आजी झल्या. परंतु त्या त्यांच्या नातवाला अजून भेटल्या नाहीत. कोरोना महामारीमुळे इतके दिवस सर्व काही बंद होते. त्यामुळे नातवाबरोबर त्यांची अजून भेट झाली नाही.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-शाळेची फी भरण्यासाठी गुलशन ग्रोव्हर यांनी विकली डिटर्जेंट पावडर, मोठ्या संघर्षाने झाले बॉलिवूडचे ‘बॅडमॅन’

-कपूर घराण्याचे पाश तोडत केली बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तर ‘या’ कारणामुळे बेबोने राकेश रोशन यांना दिला होता डच्चू

-‘कन्यादाना’बद्दल बोलणे ‘बबली गर्ल’ला पडले भलतेच महागात, सोशल मीडियावर व्यक्त होतोय संताप

हे देखील वाचा