Monday, July 1, 2024

सनी लिओनीची लाडकी लेक झाली सहा वर्षांची, वाढदिवसानिमित्त गोंडस फोटो केले शेअर

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती प्रत्येक खास गोष्ट चाहत्यांसोबत शेअर करत राहते. सनी लिओनीची मुलगी निशा वेबर गुरुवारी ( १४ ऑक्टोबर) ६ वर्षांची झाली आहे. यानिमित्ताने सनीने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात तिचे कुटुंब दिसत आहे. या पोस्टमध्ये सनी, तिचा पती डॅनियल वेबर आणि तिन्ही मुले दिसत आहेत.

सनीची तीन मुले एका फोटोत एकत्र पोझ देत आहेत. सनीने निशाचा वाढदिवस घरी साजरा केला आहे. हे घराच्या सजावटीवरून हे स्पष्टपणे दिसून येत आहे. संपूर्ण घरात रंगीबेरंगी फुगे लावलेले आहेत.

सनीने निशाच्या वाढदिवसाचे फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये निशा खूपच गोड दिसत आहे. फोटोत तिचे वडिल डॅनियल वेबर आणि तिचे गोड भाऊ देखील तिच्यासोबत दिसत आहेत. सनी लिओनीने तिच्या तीन मुलांसह कौटुंबिक फोटोही शेअर केला आहे. हे फोटो खूप सुंदर दिसत आहेत.

सनीने मुलांसोबत एक सुंदर फोटो शेअर केला आहे. ज्यात ती दोघांनाही मिठी मारताना दिसत आहे. त्यासह तिने निशाचा एक फोटो शेअर केला आहे ज्यात ती खूप क्यूट दिसत आहे. मल्टीकलर फ्लॉवरप्रिंट फ्रॉकमध्ये ती अगदी बाहुलीसारखी गोड दिसत आहे.

सनीने जुलै २०१७ मध्ये निशाला दत्तक घेतले. तिने लातूरमधून निशाला दत्तक आहे. सनी नेहमीच निशाचे गोड फोटो शेअर करत राहते. तिने स्वतःचा आणि डॅनियल वेबरचा खूप छान फोटो शेअर केला आहे. सनीचे हे फोटो इंस्टाग्रामवर खूप पसंत केले जात आहेत. सनी लिओनीने संपूर्ण टीमसोबत वाढदिवसाचा फोटो शेअर केला आहे. सनीला इंस्टाग्राम अकाऊंटवर ४८.५ मिलियन चाहते फॉलो करतात.

कॉमेडी करताना दिसणार सनी
सनी लिओनी लवकरच ॲमेझॉन प्राइम व्हिडिओच्या ‘वन माइक स्टँड सीझन २’मध्ये दिसणार आहे. सीझन १ च्या यशानंतर, ‘वन माइक स्टँड’ दुसऱ्या सीझनसह दुप्पट मजा, हास्य आणि मोठ्या नामांकित सेलिब्रिटींसह परत आला आहे. या सीझनमध्ये सनी लिओनीव्यतिरिक्त निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर, लेखक चेतन भगत आणि गायक आणि रॅपर रफ्तार दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-लईच भारी! झी मराठी पुरस्कार सोहळ्यात रोहित आणि कॅटरिनाची ‘ग्रॅंड एन्ट्री’

-‘आज कॅप्शन नाही सुचलं का?’, म्हणत रुपालीच्या फोटोवर चाहत्याचा प्रश्न; अभिनेत्रीनेही दिले हटके प्रत्युत्तर

-अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या सौंदर्यावर चाहती फिदा; म्हणाली, ‘खूप गोड दिसतेस नजर…’

हे देखील वाचा