बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच तिच्या फोटो आणि व्हिडिओमुळे सोशल मीडियाला आग लावते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तसेच तिचा सोशल मीडियावरील चाहतावर्ग खूप मोठा आहे. आपल्या चाहत्यांशी जोडून राहण्यासाठी सनी नेहमी फोटो आणि मजेदार व्हिडिओ शेअर करत असते. सनी लिओनी तिच्या ॲक्टिव्हिटीमुळे खूप चर्चेत असते. सनी अनेकदा तिच्या स्टायलिश स्टाईलमध्ये तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. अभिनेत्रीने बुधवारी (२३ मार्च) तिच्या इंस्टाग्रामवर मालदीवच्या व्हेकेशनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती मस्ती करताना दिसत आहे.
व्हिडिओमध्ये अभिनेत्री स्विमसूट घालून कॅमेरा हातात धरून वॉटर पार्कमध्ये वॉटर स्लाइड करताना दिसत आहे. १० सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये अभिनेत्री वॉटर ॲडव्हेंचर करताना खूप उत्साही दिसत आहे? स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आणि लिहिले की, ”स्लाईड असताना पायऱ्या का निवडाव्यात.”
अभिनेत्रीचा हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर २३ लाखांहून अधिक चाहत्यांनी पाहिला आहे. तसेच कमेंट करून तिचे मनापासून कौतुक देखील करत आहेत. त्याचवेळी तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, यापूर्वी ती तिच्या ‘अनामिका’ या वेबसीरिजमुळे चर्चेत होती.
अभिनेत्रीची ही वेबसिरीज १० मार्च रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म एमएक्स प्लेयरवर प्रदर्शित झाली. या सीरिजमध्ये सनी वेगळ्या अंदाजात दिसली आहे. विक्रम भट्ट यांनी दिग्दर्शित केलेल्या या मालिकेत गुप्तहेराची भूमिका साकारली होती. सनी लिओनीशिवाय सोनाली सेगल, राहुल देव, समीर सोनी, शहजाद शेख, अयाज खान या कलाकारांनीही वेबसीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
आर राधाकृष्णन दिग्दर्शित पट्टा या चित्रपटात ती लवकरच मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच ती ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ या पिरियड ड्रामा चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
सनी लिओनीची कारकीर्द
सनी लिओनीने हिंदी इंडस्ट्रीमध्ये तिच्या करिअरची सुरुवात बिग बॉस या रियॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून भाग घेऊन केली होती. तिने ‘जिस्म २’ मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर तिने ‘रागिनी एमएमएस २’, ‘वन नाईट स्टँड’ सारख्या चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा