अभिनेत्री सनी लिओनी ही बॉलिवूडमध्ये ‘बेबी डॉल’ या नावाने ओळखली जाते. नेहमीच तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिने नुकताच सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामुळे ती सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. यावेळी सनीने एक मजेशीर व्हिडिओ तिचे चाहत्यांसाठी शेअर केला आहे. तिचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. तिचा हा वेगळा व्हिडिओ पाहून चाहते खूप हसत आहेत.
सनी लिओनीने तिच्या तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, ती शॉटसाठी तयार होत असते. तिचे पूर्ण लक्ष ती नंतर करणाऱ्या शॉटकडे असते. तिचे आजूबाजूला लक्ष नसताना तिचा कास्टिंग डायरेक्टर सनी राजनी येतो आणि तिच्या कानात गुदगुल्या करतो. त्यावर सनी अस्थिर होते. सनी लिओनीचा हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
सनी लिओनीचा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. याचा अंदाज आपण येथूनच लावू शकतो की, तिच्या या व्हिडिओला आतापर्यंत 2 मिलियन पेक्षाही जास्त वेळा पाहिले गेले आहे. तसेच या व्हिडिओवर 9 लाखांपेक्षाही जास्त लाईक्स आले आहेत. सनीने याआधी जो फोटो शेअर केला होता, त्या फोटोमध्ये ती झाडावर बसलेली होती. तिचा हा फोटो देखील इतर फोटो प्रमाणे सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. सनी लिओनी ही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. त्यामुळे तिची फॅन फॉलोविंग देखील खूप आहे. तिचा कोणताही फोटो तिने शेअर केल्या क्षणीच व्हायरल होत असतो.
सनी लिओनीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘जिस्म 2’, ‘वन नाईट स्टँड’, ‘रागिणी एमएमएस 2’, ‘एक पहेली लीला’ यासारख्या चित्रपटात काम केले आहे. यासोबत ती ‘बिग बॉस’मध्ये स्पर्धक देखील होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…