Wednesday, July 3, 2024

दत्तक मुलगी निशाचा हात न धरल्याने ट्रोल झाली सनी लिओनी; पती म्हणाला, ‘ती माझ्या घरची राजकुमारी आहे’

बॉलिवूडच्या सर्वात ग्लॅमरस आणि प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक असलेली सनी लिओनी (Sunny Leone) तीन मुलांची आई आहे. सनीच्या दोन्ही मुलांचा जन्म सरोगसीद्वारे झाला असून, मुलगी निशाला सनीने दत्तक घेतले आहे. सनी तिच्या मुलांच्या खूप जवळ आहे आणि ती अनेकदा त्यांच्यासोबत मस्ती करताना दिसते. अलिकडेच सनी तिच्या तीन मुलांसह मुंबईच्या रस्त्यावर दिसली. त्यानंतर सोशल मीडिया युजर्सनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

सनी लिओनी का झाली ट्रोल?
ट्रोलर्सने सांगितले की, सनी जेव्हाही मुलांसोबत बाहेर फिरायला जाते तेव्हा ती नेहमी तिच्या दोन मुलांचा हात धरताना दिसते. सनीने आपली दत्तक मुलगी निशाचा हात कधीच धरला नाही. सनीने निशाला केवळ प्रसिद्धीसाठी दत्तक घेतल्याचेही ट्रोल्सने म्हटले आहे.

सनीच्या पतीने ट्रोलर्सला दिले उत्तर
या संपूर्ण ट्रोलिंगवर आता सनीचा पती डॅनियल वेबरने माध्यमांशी संवाद साधत आपल्या प्रिय पत्नीचे समर्थन केले आहे. सनीचा नवरा म्हणाला की, “हा सगळा मूर्खपणा आहे. मला याविषयी बोलायचेही नाही. लोक काय विचार करतात याची मला अजिबात पर्वा नाही. माझे मुलगे फक्त तीन वर्षांचे आहेत आणि ते रस्त्यावर फिरत आहेत, तर माझी मुलगी ६ वर्षांची आहे आणि तिला व्यवस्थित कसे चालायचे हे माहित आहे.” डॅनियल पुढे म्हणाला की, “निशा माझ्या घरची राजकुमारी आहे. लोकांची अशी विचारसरणी ही स्वतःसाठी एक अतिशय फालतू गोष्ट आहे.”

सनी लिओनी आणि तिचा पती डॅनियल वेबर यांनी लातूर येथील अनाथाश्रमातून निशाला दत्तक घेतले आहे. त्यावेळी निशा फक्त २१ महिन्यांची होती. यानंतर २०१७ मध्ये सरोगसीच्या माध्यमातून सनी दोन मुलांची आई झाली. आता ट्रोलर्स काहीही म्हणतील, पण सनीचे तिच्या तीन मुलांवर सारखेच प्रेम आहे.

सनी लिओनीबद्दल बोलायचे झाले, तर बॉलिवूड व्यतिरिक्त ती टीव्ही इंडस्ट्रीमध्ये खूप लोकप्रिय झाली आहे आणि साउथ इंडस्ट्रीमध्येही ती आपली उपस्थिती नोंदवत आहे. ती मल्याळम आणि तमिळ चित्रपटांमध्ये दिसणार आहे. हिंदी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर ती ‘हेलन’, ‘कोका कोला’ आणि ‘द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ सारखे चित्रपट करत आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा