बॉलिवूडमध्ये येऊन आपले पाय घट्ट रोवणे वाटते तितके सोपे नसते. मात्र, यावरही मात करणारे काही एकमेवाद्वितीय कलाकार असतातच. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी. अपार कष्ट, जिद्द आणि चिकाटीने सनीने आज आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावर तिला कोट्यवधी चाहते फॉलो करतात. तसं पाहायला गेलं तर तिचे इंस्टाग्रामवर तब्बल ४५ मिलियनपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत. आपल्या या चाहत्यांसाठी सनी नेहमी नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अशातच आता तिने एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती वेगळ्याच अंदाजात थिरकताना दिसत आहे. अभिनेत्रीचा हा अनोखा अंदाज चाहत्यांच्या तोंडावर हसू आणताना दिसत आहे.
सनीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण तिला चमकदार लेहंगा घातलेले पाहू शकतो. अभिनेत्री डान्स करताना खूपच आनंदी दिसत आहे. ती आपल्याच धुंदीत नाचत आहे. व्हिडिओ सुरू झाल्यानंतर काही वेळाने स्लो मोशन होतो.
हा व्हिडिओ शेअर करत तिने लिहिले आहे की, “जेव्हा तुमच्याकडे कोणतेही मुव्हज नसतात, परंतु तरीही तुम्ही डान्स करता.” खरं तर हा व्हिडिओ सनीने आपल्या पुढील प्रोजेक्टच्या सेटवरून शेअर केला आहे.
तरीही, अभिनेत्रीचा हा डान्स अनेकांना विचित्र वाटला. मात्र, तिच्या चाहत्यांनी या व्हिडिओवर भरभरून लाईक्स आणि कमेंट्स केल्या. सनीच्या या व्हिडिओची लोकप्रियता आपण यावरून लावू शकतो की, आतापर्यंत या व्हिडिओने ४४ लाख व्ह्यूजचा टप्पा पार केला आहे.
सनीच्या कामाबाबत बोलायचं झालं, तर ती लवकरच थ्रिलर ‘शीरो’ चित्रपटात झळकणार आहे. याव्यतिरिक्त ती विक्रम भट्ट यांच्या ‘अनामिका’ वेबसीरिजमधून आपले डिजिटल पदार्पण करताना दिसत आहे.
सनीने सन २०१२ साली ‘जिस्म २’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल टाकले होते. यानंतर ती ‘रागिनी एमएमएस २’ यांसारख्या चित्रपटात झळकली होती. ती शाहरुख खानच्या ‘रईस’ चित्रपटातील प्रसिद्ध ‘लैला’ या गाण्यातून खूप लोकप्रिय झाली. तिचा बोल्ड अंदाज चाहत्यांना खूपच भावला होता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…