Monday, January 19, 2026
Home बॉलीवूड ‘स्वर्गात अजून एक दिवस’, म्हणत सनी लिओनीने शेअर केला बिकिनीतील ग्लॅमरस फोटो

‘स्वर्गात अजून एक दिवस’, म्हणत सनी लिओनीने शेअर केला बिकिनीतील ग्लॅमरस फोटो

बॉलिवूडमधील सगळ्यात हॉट आणि बोल्ड अभिनेत्री म्हणजे सनी लिओनी. सनी देखील इतर अभिनेत्रींप्रमाणेच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. ती तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून, चाहत्यांशी जोडलेली असते. अशातच सनीने तिचा एक हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

सनी लिओनीने अधिकृत फेसबुक पेजवरून तिचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, सनीने निळ्या रंगाची बिकिनी घातली आहे. तसेच डोळ्यांवर चष्मा लावलेला आहे. ती समुद्राच्या किनारी उभी राहून बिकिनीमध्ये पोझ देताना दिसत आहे. या फोटोमध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे. तिच्या या फोटोला थोड्या ढगांनी व्यापलेले आकाश अधिकच आकर्षक आणि लक्षवेधी ठरवत आहे. ‘स्वर्गात अजून एक दिवस’ असे कॅप्शन देत तिने हा फोटो शेअर केला आहे. (Actress Sunny Leone’s bold photos viral on social media)

तिचे चाहते या फोटोवर त्यांच्या अनेक प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या या फोटोला आतापर्यंत दीड लाखापेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत. तिचे चाहते सातत्याने कमेंट करत आहेत.कोणी तिला हॉट म्हणत आहे तर कोणी तिला बोल्ड म्हणत आहे. याआधी देखील तिने तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर केले होते. तिच्या प्रत्येक फोटोला चाहत्यांनी जोरदार प्रतिसाद दिला होता.

सनी लिओनीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने ‘जिस्म 2’, ‘वन नाईट स्टॅन्ड’, ‘रागिनी एमएमएस २’, ‘एक पहेली लीला’ या चित्रपटात तिने काम केले आहे.

सनी लिओनी लवकरच विक्रम भट यांच्या ‘अनामिका’ या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. तसेच ती हॉरर कॉमेडी चित्रपट ‘कोका कोला’, ‘रंगीला’ या चित्रपटात दिसणार आहे.‌‌ ती बिग बॉसमध्ये आल्यापासून तिच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झालेली दिसून येते.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हाय गर्मी! अमृता खानविलकरच्या हॉट फोटोंनी वाढवला सोशल मीडियाचा पारा, एकदा पाहाच

-जबरदस्त! ऋतिकचे बायसेप्स पाहून चाहते तर सोडाच कलाकारही झाले हँग; टायगरने केली ‘अशी’ कमेंट

-राडाच ना! ‘या’ सेलिब्रेटींचे बाईक कलेक्शन पाहून तुमचेही डोळे होतील पांढरे

हे देखील वाचा