अभिनेत्री सनी लिओनीच्या (sunny leone) एका व्हायरल फोटोने सध्या सगळ्यांनाच गोंधळात टाकले आहे, या व्हायरल फोटोमध्ये सनीच्या संपुर्ण अंगावर मारहाणीच्या जखमा आणि खुना दिसत आहेत. त्यामुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र हा फोटो काही खऱ्या मारहाणीचा किंवा अपघाताचा नसुन सनी लिओनीच्या आगामी ‘अनामिका’ या वेबसिरीजमधील असल्याची माहिती समोर आली आहे. नेमके काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ.
सनी लिओनी ही हिंदी चित्रपट जगतातील एक प्रसिद्धी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि सौंदर्याने सनीने अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. बराच काळ सनीचा कोणताही नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला नव्हता मात्र आता सनी लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर दमदार आगमन करणार असल्याची माहिती समोर आली आहे. सनीची ‘अनामिका’ वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या सिरीजच्या प्रमोशनाला सनीने सुरूवात केली आहे. ‘अनामिका’ वेबसिरीज १० मार्चला एमएक्सवर प्रदर्शित होणार आहे.
सध्या सनी लिओनी आपल्या या आगामी वेब सिरीजचे जोरदार प्रमोशन करताना दिसून येत आहे. आपल्या सोशल मीडिया अकांउंटवरुन तिने मारहाणीचे आणि अंगावर जखमा असलेले फोटो शेअक करण्याचा धडाका लावला आहे. नुकताच तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये सनी रुग्णालयाच्या बेडवर झोपलेली दिसत होती आणि तिच्या पाठीवर तसेच चेहऱ्यावर जखमा दिसत होत्या. हा फोटो पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल, इतक्या त्या जखमा भयंकर दिसत होत्या. मात्र हा फोटो तिच्या वेबसिरीजच्या प्रमोशनचा असल्याची माहिती समजल्यानंतर सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. आता सनीच्या या वेबसिरीजची तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. यामध्ये सनीसोबत राहुल देव, सोनाली सहगल, अयाज खान आणि शहजाद शेख असे प्रसिद्ध कलाकार झळकणार आहेत.
दैनिक बोंबाबोंचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा