दरवर्षी ५ सप्टेंबर हा दिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. बॉलीवूडमध्ये शिक्षक दिनाशी संबंधित अनेक चित्रपटही बनले आहेत. शाहरुख खान आणि सुष्मिता सेन यांच्या ‘मैं हूं ना’ या चित्रपटही असाच होता. या चित्रपटात शाहरुख मेजर राम प्रसाद शर्माच्या भूमिकेत दिसला होता तर सुष्मिताने मिस चांदनीची भूमिका साकारली होती.
२००४ मध्ये रिलीज झालेला शाहरुख आणि सुष्मिताचा हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. त्यात अमृता राव, सुनील शेट्टी आणि झायेद खान यांनीही काम केले होते. मात्र, सुष्मिता सेनचे पोस्टर एका रात्रीतून बदलले होते. चित्रपटाची दिग्दर्शिका फराह खानने सुष्मिता सेनची याबाबत माफीही मागितली होती. या चित्रपटात सुष्मिताची भूमिका खूपच लहान होती.
एका मुलाखतीत सुष्मिता सेनने या विषयाबाबत सांगितले… या चित्रपटातील सुष्मिताची भूमिका खूपच छोटी होती पण प्रभावी होती. छोट्या भूमिकेमुळे सुष्मिताही घाबरली होती. फरहाने फायनल एडिट पाहिल्यावर सुष्मिताला फोन करून तिची माफी मागितली होती.
सुष्मिता म्हणते, ‘फराह खानने मला कॉल केला आणि म्हणाली, ‘सुश मी फायनल एडिट पाहिले आहे आणि मला तुझी माफी मागावी लागेल. शाहरुख, झायेद आणि अमृता यांच्या भूमिका आहेत, पण तु तिथे कमीच दिसत आहेस. मी तिला म्हणाले, ‘काही हरकत नाही फराह. आपल्यात सौदा झाला होता. तू तुझे वचन पाळलेस आणि मी माझे पाळले. आता ते पूर्ण झाले आहे. त्यामुळे याची काळजी करू नकोस.
पुढे, सुष्मिता सेनने सांगितले की चित्रपटाचे पोस्टर कसे रातोरात बदलले गेले आणि खूप छोटी भूमिका असूनही तिला पोस्टर्समध्ये स्थान मिळाले. चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान दिवंगत दिग्दर्शक यश चोप्रा यांनी सुष्मिता सेनला फोन करून तिची खूप प्रशंसा केली होती.
सुष्मिता पुढे म्हणाली, ‘मला मिळालेल्या प्रतिक्रियेवरून मला वाटले की काहीतरी बदलले आहे. भूमिका छोटी पण दमदार होती. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया एवढ्या चांगल्या होत्या की याआधी संपूर्ण मुंबईतील ‘मैं हूं ना’च्या पोस्टरमध्ये झायेद खान, अमृता राव आणि शाहरुख किंवा शाहरुख एकटाच होता, पण रिलीज झाल्यानंतर प्रत्येक पोस्टरमध्ये शाहरुख आणि मी होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
सोनम कपूर करणार पुनरागमन; पुढील वर्षी सुरु होणार मोठ्या चित्रपटाचे शूटिंग…