Friday, July 5, 2024

दुकानातून बाहेर आल्यानंतर पडता पडता वाचली सुष्मिता सेन; म्हणाली, ‘…आता पडले असते मी’

लोकप्रिय अभिनेत्री सुष्मिता सेन बॉलिवूडमध्ये तिच्या स्टाईल आणि फॅशनसाठी ओळखली जाते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. सुष्मिता अनेकदा सोशल मीडियावर नवनवीन पोस्ट शेअर करत राहते. सध्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सुष्मिता एका दुकानातून बाहेर पडताना दिसते. त्याचवेळी, तिचे हाय हिल्स सँडल अडकतात आणि ती तिचा तोल जाण्यापासून थोडक्यात बचावते. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सुष्मिताचा व्हिडिओ होतोय व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या सुष्मिताच्या या व्हिडिओमध्ये ती पांढऱ्या हाय आणि लो वन पीसमध्ये दिसत आहे. त्याचबरोबर ती या अंदाजात खूप सुंदर दिसत आहे.

पडता पडता वाचली सुष्मिता
खरं तर, सुष्मिता एका दुकानात गेली होती. ती बाहेर येते होती, तेवढ्यात तिचे हाय हिल्स दुकानाच्या बाहेर लावलेल्या जाळ्यात अडकतात आणि ती धडपडते. मात्र, यावेळी ती स्वत:ला पडता पडता वाचते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये ती “अरे बापरे आता पडले असते मी,” म्हणताना दिसत आहे. त्यानंतर ती दुकानाच्या दुसऱ्या बाजूला जाते आणि पोझ देण्यास सुरुवात करते आणि फोटो काढते.

रोहमन शॉलला करतेय डेट
सुष्मिता मॉडेल रोहमन शॉलला डेट करत आहे. तो तिच्यापेक्षा १५ वर्षांनी लहान आहे. सुष्मिताच्या दोन्ही मुलींसोबत रोहमनचे चांगले संबंध आहेत. सुष्मिता आणि रोहमन सहसा एकत्र दिसतात. घरातील प्रत्येक कार्यक्रमामध्ये रोहमन सुष्मितासोबत दिसतो. सुष्मिता आणि रोहमन लवकरच लग्न करणार असल्याचीही माहिती येत आहे, पण आजपर्यंत तिने याप्रकरणी काहीच सांगितले नाही. सध्या ती तिच्या ‘आर्य २’ या वेबसीरिजमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.

सुष्मिता गेल्या काही वर्षांत पडद्यापासून दूर राहिली असेल, पण तिच्या ग्लॅमरस पोस्टमुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. सुष्मिताने ‘आर्य’ वेबसीरिजद्वारे डिजिटल पदार्पण केले आहे. चाहत्यांसह कलाकारांनी तिच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. तिने दुसऱ्या सिझनचे शूटिंगही पूर्ण केले आहे आणि लवकरच प्रदर्शनाची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.

सुश्मिता सेनने मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकल्यानंतर चित्रपटांमध्ये प्रवेश केला होता. तिने ‘बीवी नंबर वन’, ‘मैं हूं ना’, ‘मैने प्यार क्यों किया’, ‘तुमको ना भूल पायेंगे’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-इंग्रजीवरून आणि बॉडीशेमिंगवरून ट्रोल झालेली मोनालिसा नेहमीच करते ट्रोलर्सकडे दुर्लक्ष

-आर्यन खानची रात्र कारागृहातच; सत्र न्यायालयाकडून फेटाळण्यात आला जामीन

-आर्यन खानच्या चिंतेत शाहरुख आणि गौरी झाले हतबल, त्याला सोडवण्यासाठी करताय शर्थीचे प्रयत्न

हे देखील वाचा