Tuesday, October 14, 2025
Home बॉलीवूड ‘सिंहीण परत आलीये…’, सुष्मिता सेनच्या ‘या’ खतरनाक स्टाइलने उडणार होश

‘सिंहीण परत आलीये…’, सुष्मिता सेनच्या ‘या’ खतरनाक स्टाइलने उडणार होश

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन आपल्या नवनवीन स्टाईल आणि ग्लॅमरस अंदाजमुळे सतत चर्चेत असते. तसेच ती अनेकदा आपल्या कामाने आणि विचारांनी चाहत्यांना इंप्रेस करत असते. नुकतेच सुष्मिता सेनने ट्विटरवर आपल्या खतरनाक स्टाइलची झलक दाखवली आहे. सुष्मिता सेनने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये प्रत्येकजण तिला पाहण्यास उत्सुक दिसत आहे. माजी मिस युनिव्हर्सचा हा लूक तिच्या सुपरहिट वेब सीरिज ‘आर्या’च्या सीझन २ मधील आहे. सुष्मिता सेनने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर डिझ्नी प्लस हॉटस्टारच्या लोकप्रिय वेब सीरिज ‘आर्या २’ बद्दल घोषणा केली आहे आणि सांगितले आहे की, यावेळी ही सीरिज पूर्वीपेक्षा जास्त खतरनाक असणार आहे.

‘आर्या २’ चा फर्स्ट लूक प्रदर्शित करताना सुष्मिता सेनने लिहिले, ‘फर्स्ट लूक. सिंहीण परत आली आहे. हे पूर्वीपेक्षा जास्त खतरनाक असणार आहे. ‘आर्या २’ लवकरच येत आहे.” सुष्मिताच्या या सीरिजचे दिग्दर्शक राम माधवानी आहेत. सीरिजच्या पहिल्या सीझनला चाहत्यांचे खूप प्रेम मिळाले आणि सुष्मिताची व्यक्तिरेखाही खूप पसंत केली गेली. आता ‘आर्या’ची कथा पुढे सरकताना दिसणार आहे.

दुसऱ्या सीझनबद्दल दिग्दर्शक राम माधवानी म्हणाले की, “पहिल्या सीझनसाठी आम्हाला मिळालेलं प्रेम आणि आपुलकी खूप आनंददायी होती, म्हणून आम्ही सर्व प्रेम आणि मेहनत घेऊन दुसरा सीझन करण्याचा निर्णय घेतला. इंटरनॅशनल एमी अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट नाटक श्रेणीमध्ये शोचे नामांकन या कहाणीमध्ये आमचा विश्वास प्रदर्शित करतो, जे आम्ही ऐकवण्यासाठी येथे आहोत. आर्याच्या प्रवासातील पुढचा टप्पा शोच्या चाहत्यांसमोर मांडण्यासाठी मी उत्सुक आहे. तिला प्रत्येक टप्प्यावर आव्हानांचा सामना करावा लागतो. कारण तिला तिचे कुटुंब जिवंत ठेवणे आणि बदला घेणे यामधील संतुलन राखणे भाग पडते.”

सुष्मिता सेनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकल्यानंतर तिने चित्रपटांमध्ये प्रवेश केला होता. तिने ‘बीवी नंबर वन’, ‘मैं हूं ना’, ‘मैने प्यार क्यों किया’, ‘तुमको ना भूल पायेंगे’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा