Tuesday, August 5, 2025
Home बॉलीवूड तालिबान प्रकरणात अभिनेत्री स्वराची वादग्रस्त प्रतिक्रिया; होतेय अटकेची मागणी

तालिबान प्रकरणात अभिनेत्री स्वराची वादग्रस्त प्रतिक्रिया; होतेय अटकेची मागणी

अफगाणिस्तानची सध्याची परिस्थिती पाहता त्यावर संपूर्ण जगभरातील सेलेब्रिटींपासून ते सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत प्रत्येकजण प्रतिक्रिया देत आहे. अनेकजण हळहळ व्यक्त करताना दिसत आहेत. तसेच अभिनेत्री स्वरा भास्करने अलिकडेच याबाबत आपले मत मांडले आहे. तिला या प्रतिक्रियेमुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागल्याचे दिसत आहे. स्वराने जे काही लिहिले आहे, त्यावर नेटकरी तिला प्रचंड ट्रोल करत आहेत.

ट्विटरवर #ArrestSwaraBhasker हा हॅशटॅग प्रचंड ट्रेंडिंगमध्ये आहे.वकील कल्पना श्रीवास्तव यांनी ई-तक्रार दाखल केली. त्या तक्रारीत स्वराला अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. यानंतर कल्पना यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. सतत वादात असणारी स्वरा भास्कर आता या संपूर्ण घटनेनंतर पुन्हा एकदा वादात सापडली आहे.

काय म्हणाली होती स्वरा भास्कर?
स्वराने तिच्या ट्विटरवर वर एक पोस्ट शेअर केली होती. स्वरा भास्करवर एका ट्वीटमार्फत तालिबानी आंतकवाद्यांची तुलना हिंदुत्वाशी करण्याचा आरोप लावण्यात आला आहे. तिने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, “आपण हिंदुत्त्वाद्वारे पसरवल्या जाणाऱ्या दहशतीमुळे शांत बसू शकत नाही. मग तालिबानद्वारे पसरवल्या जाणाऱ्या दहशतीमुळे घाबरुन जाऊन शांत का बसावे; हे चुकीचे आहे. जर मग हिंदुत्वाच्या दहशतीवरुन आपण नाराज होतो. मग तालिबानमधील दहशतीवरुनही आपली मानवतावादी आणि नैतिक मूल्ये अत्याचारी किंवा दडपशाहीच्या ओळखीवर आधारित नसावीत.”

तिच्या या ट्वीटवर युजर्स स्वराला अटक करण्याची मागणी करत आहेत.

तसेच अनेक चाहते ट्वीट करत स्वरावर नाराजी व्यक्त करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भल्या पहाटे अमिताभ बच्चन यांनी उलगडले सोशल मीडियाचे रहस्य; नेटकरी म्हणाले, ‘झोपा आता’

-हम साथ साथ है! रिया कपूरच्या लग्नानंतर पुन्हा एकत्र आले ‘कपूर खानदान’, सोनम कपूरने केले फोटो शेअर

-व्हिडिओ: राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी पहिल्यांदाच दिसली सेटवर; चेहऱ्यावर होती उदासी

हे देखील वाचा