Wednesday, February 4, 2026
Home बॉलीवूड तब्बल अडीच वर्षांनी आपल्या घरी पोहोचली स्वरा; ७ तास चालली गृहप्रवेशाची ७ प्रकारची पूजा

तब्बल अडीच वर्षांनी आपल्या घरी पोहोचली स्वरा; ७ तास चालली गृहप्रवेशाची ७ प्रकारची पूजा

अभिनेत्री स्वरा भास्कर बऱ्याच काळानंतर आपल्या घरी शिफ्ट झाली आहे. तिने आपल्या घराचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचबरोबर स्वरा भास्करने गुरुवारी (२६ ऑगस्ट) तिच्या घरात गृहप्रवेशची पूजा देखील केली आहे. त्याच दरम्यानचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तसेच स्वराने सांगितले आहे की, ती २०१९ पासून या घरात राहत नव्हती.

स्वराने घरात केलेल्या पूजाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना तिने लिहिले की, “देवाने मंजूर केले आहे.” याचबरोबर तिने गृहप्रवेश आणि नवीन- जुने घर आणि नवीन सुरुवात अशा हॅशटॅगचा देखील वापर केला आहे. फोटोंमध्ये स्वराने पंडित जींसोबत पूजा करतानाचे फोटो शेअर केले आहेत. (Actress Swara Bhaskar renovated her house, moved in after two years)

स्वराने ट्वीट करत लिहिले आहे की, “मी २.५ वर्षांनी माझ्या जुन्या घरी जात आहे. फेब्रुवारी २०१९ नंतर जुन्या घरात पहिली रात्र. या महामारीमुळे, संपूर्ण जग, प्रत्येकाचे जीवन, माझे जीवन बदलले आहे.” सोशल मीडियावर स्वराचे चाहते तिचे घरात स्थलांतर केल्याबद्दल अभिनंदन करत आहेत. स्वरा तिच्या जुन्या घरी परत गेल्यामुळे चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्वराच्या घरात गृहप्रवेशाची पूजा जवळजवळ ७ तास चालली. या ७ तासांच्या पूजेत त्यांनी ७ प्रकारची पूजा केली आहे.

स्वरा भास्करने २००९ च्या ‘मधोलाल कीप वॉकिंग’ या नाटकातील सहाय्यक भूमिकेतून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. परंतु तिला यात अपयश मिळाले होते. त्यानंतर ‘तनू वेड्स मनू’ या चित्रपटात काम केले. हा चित्रपट २०११ मध्ये आला होता. या चित्रपटातील तिच्या अभिनयाला समीक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि तिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीसाठी फिल्मफेअरचे नामांकनही मिळाले होते. त्याचबरोबर तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी स्क्रीन पुरस्कार मिळाला होता.

त्यानंतर तिने ‘प्रेम रतन धन पायो’, ‘अनारकली ऑफ आरा’, ‘नील बट्टे सन्नाटा’, ‘रांझना’ यांसारख्या चित्रपटात काम केले. तिचा शेवटचा चित्रपट ‘वीरे द वेडिंग’ हा होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘परी म्हणू की सुंदरा, श्रुतीची अदा करी नेहमीच फिदा,’ अभिनेत्रीच्या फोटोंचा सोशल मीडियावर राडा

-मोनालिसाने ‘साड़ी के फॉल सा’ गाण्यावर लावले जोरदार ठुमके; सोनाक्षीचाही डान्स वाटेल तिच्यासमोर फिका

-‘पद्मावत’ फेम सरभ आहे मानसशास्त्राचा पदवीधर; रणवीरला त्याची ‘ही’ गोष्ट आवडल्याने मिळाला चित्रपट

हे देखील वाचा