Saturday, June 29, 2024

आपल्या विवादित आणि मुक्त वक्तव्यांमुळे सतत चर्चित असणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखले का?

बॉलीवूड कलाकारांसंबंधित कोणत्याही गोष्टी असोत, त्यांच्या पोस्ट्स असोत किंवा त्यांचे बालपणीचे फोटो असोत, सोशल मीडियावर दिसताच सर्व चाहत्यांमध्ये अगदी उत्सुकता लागते. काही दिवसांपासून सोशल मीडियावर अनेक अभिनेत्रींंचे बालपणीचे फोटो व्हायरल होत आहेत. जे त्यांच्या चाहत्यांना ओळखू येत नसतात. आता पुन्हा एका अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो ओळखणे सगळ्यांनाच कठिण झाले आहे. या व्हायरल फोटो मध्ये दिसणारी गोंडस मुलगी कोण असावी असाच प्रश्न प्रत्येकाला पडला आहे. काय आहे सगळं प्रकरण चला जाणून घेऊ.

सध्या सोशल मीडियावर हिंदी चित्रपटसृष्टीतील एका आघाडीच्या अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या फोटोमध्ये डोक्यावर टोपी घालून आईच्या मांडीवर दिसणारी ही मुलगी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. फोटोमध्ये दिसणारी ही मुलगी आज एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे, ती तिच्या चित्रपटांसह सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ही अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आणि कामासंबंधित सर्व गोष्टी शेअर करत असते. प्रत्येक सामाजिक प्रश्नावरही ती मुक्तपणे आपले मत मांडते. आता तुम्ही या मुलीला ओळखले असेल. जर तुम्हाला अजूनही समजत नसेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो की ही चिमुरडी दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री स्वरा भास्कर आहे, जी तिच्या बिनधास्त बोलण्यामुळे प्रसिद्ध आहे.

हा फोटो स्वतः स्वराने तिच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शेअर केला होता. यावेळी खूप व्हायरल होत आहे. स्वरा हिंदी चित्रपटसृष्टीत दीर्घकाळापासून आहे, आतापर्यंत तिने अनेक दमदार चित्रपटात काम केले आहे. स्वरा भास्करने पहिल्यांदा थिएटरमध्ये काम केले, त्यानंतर 2008 मध्ये ती मुंबईत आली. ‘तनु वेड्स मनू’ या पहिल्याच चित्रपटातील तिच्या भूमिकेला खूप पसंती मिळाली. ती रांझना, निल बट्टे सन्नाटा, अनारकली ऑफ आराह, वीरे दी वेडिंग, प्रेम रतन धन पायो आणि चिल्लर पार्टी यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिकांमध्ये दिसली. स्वराच्या चित्रपटांचे आणि अभिनयाचे नेहमीच कौतुक केले जाते. (actress swra bhaskar childhood photo goes viral on social media)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दुलारी खेर यांनी केले पीएम मोदी यांच्या पदवीवर भाष्य, नेटकरी म्हणाले ‘केजरीवालांना उत्तर मिळाले’
‘खतराे के खिलाडी’शाेची ऑफर धुडकावून ‘या’ अभिनेत्रीने केली माेठी चुक? चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी     

हे देखील वाचा