Saturday, June 29, 2024

तोबा तोबा! दोन नाड्यांनी सांभाळला अभिनेत्रीचा ड्रेस, ४ तासातच १ लाख लोकांनी पाडला लाईक्सचा पाऊस

टॉलिवूड ते बॉलिवूड असा प्रवास करणाऱ्या खूप कमी अभिनेत्री आहेत. त्यापैकीच एक म्हणजे निर्भीड अभिनेत्री तापसी पन्नू होय. तापस समाजातील प्रत्येक मुद्द्यांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसते. ती तिच्या बेधडक वक्तव्यासोबतच तिच्या अभिनयातूनही प्रेक्षकांची मने जिंकत असते. याव्यतिरिक्त ती सोशल मीडियावरही जबरदस्त सक्रिय असते. ती दरदिवशी तिचे नवनवीन फोटो शेअर करत असते. अशातच तिने तिचा एक लेटेस्ट फोटो शेअर केला आहे. या फोटोवरून नजर हटवणेही चाहत्यांना कठीण होत आहे.

अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) हिने शेअर केलेल्या लेटेस्ट फोटोत ती बोल्ड अंदाजात दिसत आहे. तिचा या अंदाजातील लूक प्रत्येकाची मने जिंकत आहे. तापसीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम (Taapsee Pannu Instagram) अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी परत आलीये.” यासोबतच तिने हॅशटॅग दोबारा हेदेखील लिहिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taapsee Pannu (@taapsee)

याव्यतिरिक्त तिने तिच्या इंस्टा स्टोरीवरही काही फोटो शेअर केले आहेत. यातील अनेक फोटोत ती बॅक पोझ देताना दिसत आहे. तसेच, काही फोटोंमध्ये तिने खुर्चीवर बसून एकापेक्षा एक पोझ दिल्या आहेत. तापसीच्या या अदांवर चाहते अक्षरश: वेडे झाले आहेत. या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडून तिचे कौतुक करत आहेत. तिच्या या पोस्टला ४ तासांच्या आतच १ लाख लाईक्स मिळाले आहेत. तसेच, ४०० हून अधिक कमेंट्सही मिळाल्या आहेत.

या फोटोत ती पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. मात्र, तिने हा फोटो पाठीमागून घेतला आहे. म्हणजेच, तापसी कॅमेऱ्याकडे पाठ करून उभी आहे. तिच्या ड्रेसची डिझाईन ही तिच्या चाहत्यांना खूप आवडत आहे. तिने या शानदार आऊटफिटसोबतच केस कुरुळे केले आहेत आणि केसांची पोनी टेल बनवली आहे. यासोबतच तिने न्यूड मेकअपही केला आहे. या सर्वांमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

तापसीच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर ती भारतीय महिला संघाची माजी क्रिकेटपटू मिताली राज हिच्या ‘शाबाश मिथु’ या बायोपिकमध्ये दिसली होती. आता ती लवकरच ‘दोबारा’ या सिनेमात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-
धक्कादायक! ‘खतरों के खिलाडी’ बनायला निघालेली अभिनेत्री उंचीवरून आपटली पाण्यात, रुग्णालयात करावे लागले दाखल
सचिवला सोडून ‘या’ व्यक्तीच्या गळ्यात पडली ‘पंचायत’मधील रिंकी, नेटकरी म्हणाले, ‘देख रहा है न बिनोद’
दो दिल एक जान! बॉलिवूडमधील ‘या’ कलाकारांनी सुखदुःखात साथ देत निभावली मैत्री, आजही होते चर्चा

हे देखील वाचा