Wednesday, July 3, 2024

माणुसकी काय ती हीच!! तापसी पन्नूने वाचवला वृद्ध महिलेला जीव, सोशल मीडियावर होतेय प्रशंसा

आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू ही सध्या सोशल मीडियावर आपल्या आगामी चित्रपटामुळे खूपच चर्चेत आहे. तापसी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती केवळ तिचे फोटो शेअर करत नाही, तर देशात चालू असणाऱ्या अनेक घडामोडींवर तिचे मत व्यक्त करताना दिसत असते. नुकतेच तिने एक कौतुकास्पद काम केले आहे. एका वृद्ध महिलेला तिने प्लेटलेट्स (रक्तातील महत्त्वाचा घटक) डोनेट केले आहे. यामुळे सोशल मीडियावर तिची प्रशंसा केली जात आहे.

तापसी पन्नूचे कौतुक करते वेळी अभिनेत्री ‘तिलोत्तमा शोम’ हिने असे ट्वीट केले की, “मी कधीही तापसीसोबत काम नाही केले. पण मला या गोष्टीची माहिती आहे की, ती खूप मेहनती आहे. मला या गोष्टीची जाणीव होती की, तापसी खूप चांगली मुलगी आहे. तिने वास्तवात प्लेटलेट्स डोनेट करून खूप महान कार्य केले. मी तू केलेल्या कामाबद्दल खूप कौतुक करते, आणि तुला शुभेच्छा देखील देते.”

तापसीने अभिनेत्री तिलोत्तमा हिच्या ट्विटला उत्तर देत असे लिहिले आहे की, “मला एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवण्याची संधी मिळाली आणि मी ते करणार नाही असं होऊ नाही शकत. माझ्यासाठी ही गोष्ट इतर गोष्टींपेक्षा खूप मोठी आहे. तू माझ्यावर नेहमी प्रेम करत रहा.”

तापसीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती या वर्षी अनेक चित्रपटात दिसणार आहे. ती ‘शाब्बास मिट्ठू’ या चित्रपटाची शूटिंग करत आहे. या चित्रपटात ती भारतीय क्रिकेट महिला संघातील पूर्व कर्णधार मिताली राज हिचे पात्र निभावताना दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हॉलिवूडमधील ‘द सुसाईड स्क्वॉड’ चित्रपटाचा ट्रेलर झाला रिलीझ, जॉन सीनाचा जबरदस्त अंदाज

-‘खूप भारी दिसतेय’, हिना खानच्या समुद्रावरील ग्लॅमरस फोटोंवर चाहत्याची कमेंट

-हिना खानच्या हॉट अंदाजावर चाहत्यांसह सेलिब्रिटीही फिदा! कमेंट्स करत केले अभिनेत्रीचे कौतुक

हे देखील वाचा