Saturday, June 29, 2024

‘पुरुषाचे शरीर’, म्हणणाऱ्या युजरला तापसी पन्नूचे खणखणीत प्रत्युत्तर; म्हणाली, ‘फक्त ही ओळ लक्षात ठेव…’

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती तिच्या चाहत्यांबरोबर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेचा विषय ठरत असते. तापसी पन्नू तिच्या आगामी चित्रपट ‘रश्मि रॉकेट’ सोशल मीडियावर जोरदार प्रमोशन करत आहे. नुकताच तिच्या चित्रपटाचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये अभिनेत्रीची मस्कुलर बॉडी दिसत आहे. तापसीने ‘रश्मि रॉकेट’साठी तिचे शरीर तयार करण्यासाठी किती मेहनत घेतली आहे, हे या फोटोतून समजते. सोशल मीडिया युसर्स तापसीच्या शरीराबद्दल वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देत आहेत. ट्विटरवर तापसीने सोशल मीडिया युसर्सला मजेदार पद्धतीने उत्तर देऊन त्यांची बोलती बंद केली आहे.

तापसी पन्नूने तिच्या आगामी ‘रश्मि रॉकेट’ चित्रपटाच्या शेअर केलेल्या या फोटोमध्ये अभिनेत्रीची मागील बाजू दिसत आहे. यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “खूप डोक्यावर चढवलं आहे, कोणाचेही ऐकत नाही, पण स्वतःचे ऐकते… ही एक खूप मोठी गोष्ट आहे. तूफान येण्याच्या आधीची शांती.” या फोटोतील तापसीची बॉडी पाहून एक युजर म्हणाला की, “माझं ऐक बॉडी बनव यार.” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “माइंड ब्लोइंग ट्रान्सफॉर्मेशन.” आणखी एका युजरने लिहिले की, “ओएमजी दंड तर पाहा जरा.”

याव्यतिरिक्त एका युजरने अशी कमेंट केली की, त्यावर तापसीने सडेतोड प्रत्युत्तर दिले. तापसीचा फिटनेस पाहून एका युजरने ट्विटरवर लिहिले की, “ही पुरुषाच्या शरीरासारखी फक्त तापसी पन्नूच असू शकते.” याला उत्तर देताना तापसीने लिहिले की, “फक्त ही ओळ लक्षात ठेवा आणि २३ सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षा करा. यासाठी आधीच धन्यवाद, मी या कॉम्प्लिमेंटसाठी खरंच खूप मेहनत घेतली आहे.”

तापसी पन्नूने तिच्या चित्रपटाचे पोस्टर इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत लिहिले आहे की, “ही आव्हानात्मक शर्यत सुरू झाली आहे आणि ही रावण दहनावरच थांबेल. रश्मिला या वर्षी खूप नाश करायचा आहे.”

स्पोर्ट्स ड्रामावर आधारित तापसी पन्नूचा ‘रश्मि रॉकेट’ चित्रपट १५ ऑक्टोबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-आनंद गगनात मावेना! आधी बॉलिवूडमध्ये पदार्पण अन् आता ‘मल्टीप्लेक्स’चा मालक बनलाय विजय देवरकोंडा

-कपाळावर कुंकू लावून तुरुंगातून बाहेर निघाला राज कुंद्रा, ६४ दिवसांनी मिळाला जामीन

-‘मला दिव्याने आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले’, नेहाच्या वक्तव्यावर विजेतीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

हे देखील वाचा