तेजश्री प्रधान (Tejashri Pradhan) ही मराठी मालिका जगतातील सर्वात यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या सोज्वळ सौंदर्याने आणि कसदार अभिनयाने तिने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या प्रत्येक मालिकेला आणि चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळत असतो. आता तेजश्रीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली असून तिचा अन्या चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री तेजश्रीनेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन याबाबतची पोस्ट शेअर केली आहे.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, अभिनेत्री तेजश्री प्रधानचा अन्या चित्रपट १० जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात अतुल कुलकर्णी, प्रथमेश परब, भूषण प्रधान, अशा अनेक दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. त्याचबरोबर हिंदी आणि बंगाली सिनेसृष्टीत नाव कमावणाऱ्या रायना सेन, यशपाल शर्मा, गोविंद नाम या कलाकारांनीही भूमिका साकारली होती. अन्या चित्रपटाने स्विडन आणि लंडनमधील चित्रपट महोत्सवात बेस्ट फिल्म डायरेक्टर आणि बेस्ट पिक्चर असे दोन पुरस्कार पटकावले आहेत. त्यामुळे या चित्रपटाचा आधीपासूनच बोलबाला सुरू झाला आहे. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शनाचे आधीच अनेक चित्रपट महोत्सवात कौतुक झाल्याने प्रेक्षकांना आता हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली आहे.
अन्या चित्रपटातची कथा एका नाविण्यपूर्ण विषयांवर आधारित असून चित्रपटाचे दिग्दर्शन सिम्मी जोसेफ यांनी केले आहे. अन्या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यादाच मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे सिम्मी जोसेफ हे प्रसिद्ध दाक्षिणात्य दिग्दर्शक आहेत. त्यांनी दाक्षिणात्य सिनेसृष्टीत अनेक नाविण्यपूर्ण विषयांवरील चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे पहिल्यांदाच त्यांनी दिग्दर्शित केलेला अन्या चित्रपट पडद्यावर किती कमाल करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. अभिनेत्री तेजश्रीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन चित्रपटाचा पोस्टर शेअर केला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
- हेही वाचा-
- काय सांगता ! म्हणून रणबीर-आलियाने लग्नात ७ नाही तर घेतले ४ फेरे, कारण ऐकून तुम्हीही व्हाल हैराण
- रॉकीने घातला सिनेमागृहात धुमाकूळ, ‘केजीएफ २’ ची पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई
- HAPPY BIRTHDAY : ‘इंडियन आयडॉल’च्या ऑडिशनमध्ये रघुरामला केले होते रिजेक्ट, ८ वर्षांनंतर मिळवला गायनाचा मोठा पुरस्कार