सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस सर्वांना ‘बिग बॉस’ १५ चे वेध लागले आहे. सलमान खान सूत्रसंचालित ‘बिग बॉस’मध्ये आता कोण कोणते स्पर्धक घरात जाणार, याकडे चाहत्यांचे लक्ष आहे. अशातच टीव्ही शोमधील, अनेक मालिकांमधील कलाकारांची नावे समोर येत आहेत. सध्या यामध्ये ‘स्वरागिनी’ फेम अभिनेत्री तेजस्वी प्रकाशच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
तेजस्वी यंदा ‘बिग बॉस’च्या घरात हजेरी लावणार असल्याचं म्हटलं जातंय. यासाठी तिने ‘झी कॉमेडी फॅक्टरी’ या शोमधून देखील रजा घेतली आहे. या शोच्या प्रमोशनसाठी ती ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर देखील पोहचली होती. परंतु तिला बिग बॉसच्या घरामध्ये जाण्याची एवढी ओढ लागली आहे की, ती आता कॉमेडी शोला नाकरण्यास देखील तयार झालीये. गेल्या आठवड्यापासून ती या शोच्या सेटवर दिसत नसल्याने तिच्या चाहत्यांनी हा अंदाज बांधला आहे. (Actress tejasswi Prakash impressed Salman Khan as Rohit Shetty bigg Boss 15 show)
अभिनेत्री कायमच तिच्या दमदार अभिनयासह तिच्या तटस्थ भूमिकेमुळे देखील चर्चेत असते. ती एक धीट आणि हुशार महिला आहे. या आधी ती ‘खतरों के खिलाडी’मध्ये देखील झळकली होती. या शोमध्ये ती खूप चांगल्या पद्धतीने स्टंट करत होती. निर्भीडपणे प्रत्येक सामना पार करायची. या शोमध्ये तिने अनेक प्रेक्षकांची मने जिंकली. ‘खतरों के खिलाडी’मध्ये झळकण्याआधी तिने अनेक मालिकांमध्ये काम केले होते. त्यामुळे सर्वांनी तिला बबली, क्यूट आणि जॉली अशा स्वभावात पाहिले. प्रथमच तिला जीवघेणे स्टंट सहज पार करताना पाहून रसिक प्रेक्षकांनी तिच्या या निर्भिडपणाला खूप दाद दिली. यामध्ये रोहित शेट्टी तिला कायम चिडवत असायचा. सर्वांना तीच जिंकणार असे वाटायचे. पण तिच्या डोळ्याला दुखापत झाल्याने तिने ‘खतरों के खिलाडी’ १०च्या अंतिम सामन्या आधीच बाहेर पडायचे ठरवले. तिच्या चाहत्यांना विश्वास आहे की, जसे तिने खतरनाक स्टंट करत रोहित शेट्टीचे मन जिंकले, तसेच ती बिग बॉसच्या घरात राहून सलमानचे देखील मन जिंकेल.
‘बिग बॉस’च्या घरामध्ये ती आल्यास या शोला तिचा खूप फायदा होईल. कारण तिचा चाहता वर्ग फार मोठा आहे. तसेच ती निडर, उत्तम खेळाडू, संयमी आणि कुशल बुद्धीची आहे. तिने या शोमध्ये पाऊल ठेवल्यास प्रेक्षकांचे खूप छान मनोरंजन होईल.
तिच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाल्यास तेजस्वी सर्वप्रथम ‘२६१२’मध्ये झळकली होती. त्यानंतर ‘संस्कार’ या मालिकेमध्ये देखील तिने अभिनय केला. तिच्या अभिनयाने तिने ‘स्वरागिनी’ मालिकेमधून यश संपादन केले. या मालिकेमधून ती घराघरात पोहचली. त्यानंतर तिने ‘पेहरेदार प्यार की’, ‘रिश्ता लिखेंगे हम नया’, ‘कर्ण संगिनी’, ‘सिलसिला बदलते रिश्ते का’, ‘शादी हो तो ऐसी’ या मालिकांमध्ये दमदार कामगिरी केली. ‘किचन चॅम्पिअन’ ५ मध्ये देखील ती सहभागी झाली होती. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने उत्तम महिला अभिनेत्रीचा पुरस्कार देखील जिंकला आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कोणी म्हणतंय ‘रावणाचा ड्रेस’, तर कोणी ‘पक्षीराज’; विचित्र आउटफिटमुळे ट्रोल झाली उर्वशी
-राज कुंद्राच्या सुटकेनंतर गहना वशिष्ठने शेअर केली पोस्ट; म्हणाली, ‘तू खूप…’