छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्वी प्रकाश नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. तेजस्वी नेहमीच तिचा बॉयफ्रेंड करण कुंद्रा यांच्यासोबत वेळ घालवताना दिसते. त्यांच्यातील नाते घट्ट असल्याचे दिसून येते. तेजस्वी ही करणबद्दल किती गंभीर आहे, हे वेळोवेळी दिसून आले आहे. असेच काहीसे पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. तेजस्वीने त्या व्यक्तींशी पंगा घेतला आहे, जे करणबद्दल वाईट गोष्टी बोलत आहेत. तिने सोशल मीडियावर करणला ट्रोल करणाऱ्या लोकांना झापले आहे.
काही लोक करण कुंद्रा (Karan Kundrra) याच्या मरणाबाबत प्रार्थना करत होते. त्यांचा असा विश्वास होता की, करणचे निधन झाल्यानंतर तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) सुखात आयुष्य जगू शकेल. तेजस्वी प्रकाशलाही शहनाझ गिल हिच्याप्रमाणे आपल्या कारकीर्दीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. विशेष म्हणजे, हे वक्तव्य करणारे लोक स्वत:ला तेजस्वीचे चाहते म्हणत आहेत. इतकेच नाही, तर एका युजरने करण कुंद्राविरुद्ध विचित्र गोष्टी बोलत आहेत.
या लोकांना प्रत्युत्तर देताना करण कुंद्रा याने लिहिले की, “चाहते होण्यासाठी लोक त्यांची पातळी सोडत आहेत. लोक फोटो एडिट करत आहेत. गैरवर्तन करत आहेत. असे करून हे लोक स्वतःचा अपमान करत आहेत. तेजस्वी प्रकाश तुला तुझ्या अशा चाहत्यांचा अभिमान असेल.” करण कुंद्राचे ट्वीट पाहून तेजस्वी प्रकाशलाही स्वतःला रोखू शकली नाही.
Wow..! lowest of lows has been achieved by certain fandom.. editing pics morphing abuses hahah khud ki beizzati lol.. you must be so proud of them T #AreYouSerious!!!! ????????
— Karan Kundrra (@kkundrra) June 28, 2022
तेजस्वीने चाहत्यांचे हे ट्वीट पाहून चांगलीच आगपाखड केली. तिने करणच्या पोस्टवर कमेंट करत तिच्या चाहत्यांना झापले. तिने लिहिले की, “मला कोणाचाही अभिमान नाही. मला विश्वास होत नाहीये की, हे माझे चाहते आहेत. लोक तुझ्याबद्दल वाईट गोष्टी बोलत आहेत.”
Proud of? M confused… such people can’t be my fans… people who have these thoughts about you… or for that matter about anyone… I still am with my guy to make him understand… but people need to understand when you use such harsh words against someone…people can break…peace
— Tejasswi Prakash (@itsmetejasswi) June 28, 2022
पुढे तेजस्वीने लिहिले की, “जो मला समजतो, मी त्याच्यासोबत आहे. हे लोकांनी समजून घेतले पाहिजे. असे शब्द कोणाच्याही विरोधात वापरू नयेत.” तेजस्वीचा राग पाहून त्यानंतर करण तिला समजावताना दिसतो.
Awe baby you take things very seriously lol.. these frustrated low lives don’t affect me and the only thing that’s breaking here is their hypocrisy ???????? aag lage inki soap mentality mein Kundrra hamesha masti mein ????????
— Karan Kundrra (@kkundrra) June 28, 2022