Saturday, June 15, 2024

‘तेजाज्ञा’च्या साडीत खुलून आलं तेजस्विनीचं रूप; सिद्धार्थ अन् प्राजक्ताच्या कमेंटने वेधले सर्वांचे लक्ष

तेजस्विनी पंडित मराठी सिनेसृष्टीतील एक अतिशय नामांकित आणि प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मनोरंजन क्षेत्रातील एक मोठे नाव असण्याबरोबरच, ही अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. बर्‍याचदा तिचे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत असतात. ही मराठमोळी अभिनेत्री तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असते. तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी ती सतत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत राहते. तिच्या या पोस्ट्सला चाहत्यांकडूनही खूप प्रेम मिळते. त्यामुळे तिचे फोटो बरेच व्हायरल होत असतात. अशातच तिचे काही फोटो समोर आले आहेत.

तेजस्विनीने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती खूपच सोज्वळ आणि सालस दिसत आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने चॉकलेटी रंगाची साडी नेसली आहे. यावर तिने गळ्यात मोत्याची माळ घातली आहे. तिने कपाळाला छोटीशी टिकली लावून सगळे केस मागे बांधले आहेत. या साडीमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. (Actress Tejaswini pandit share her photos on social media)

हे फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “तेजाज्ञाची साडी आणि थोडा ड्रामा पल्लू दाखवायला.” तिचा हा लूक अनेकांना खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर कमेंट करत आहेत. अभिनेत्री प्राजक्ता माळीने या फोटोवर “पारिजातक” अशी कमेंट केली आहे, तर सिद्धार्थ जाधवने हार्ट ईमोजी पोस्ट केल्या आहेत. यासोबत तिचे अनेक चाहते या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

तेजस्विनीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने ‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटात खलनायिकेची भूमिका निभावली होती. त्यानंतर तिने ‘रखेली’ या नाटकात काम केले. तिला ‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटातून खूप ओळख आणि लोकप्रियता मिळाली. तसेच तिने ‘तू ही रे’ या चित्रपटात काम करून सगळीकडे आपली ओळख निर्माण केली. या चित्रपटात तिच्यासोबत सई ताम्हणकर आणि स्वप्निल जोशी हे होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘आई कुठे काय करते’ मालिकेसाठी रुपाली भोसलेला मिळाला ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार, पडतोय कमेंट्सचा पाऊस

-लय भारी! ‘बिग बॉस मराठी’च्या चावडीवर येणार ‘भाईजान’, म्हणाला, ‘ओ भाऊ…’

-असे काय घडले की, निलेश साबळे आणि टीमला मागावी लागली केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची माफी

हे देखील वाचा