कंगना रणौत हि बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटातुन प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तर आज कंगना रणौत हिचा वाढदिवस आहे. आणि ती आता 40 वर्षांची झाली आहे. कंगना (Kangana)रणौत हिने अभिनयासोबत राजकारणात हि प्रवेश केला आहे. आणि ती लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे भाजपाचे प्रतिनिधित्व करते. तिने अभिनाय ही उत्तम केला आणि सर्वात श्रीमंत कलाकारांच्या यादीत तिचा समावेश आहे.
अभिनेत्री कंगना रणौत हिने वयाच्या 17 व्या वर्षी ती घरातून पळून दिल्लीला गेली होती. मग तिने अभिनयात आपले नशीब आजमावले. कंगना रणौतचे वडील अमरदीप रणौत हे आहेत. आणि ते एक व्यावसायिक होते, तसेच आई शाळेत शिक्षिका होती. कंगनाच्या वडीलांना वाटायचे कि, तिने डॉक्टर व्हावे, पण कंगनाला हे पंसद नव्हते. तिच्या वैद्यकीय शिक्षणासाठी, कंगनाला चंदीगडच्या डीएव्ही स्कूलमध्ये पाठवण्यात आले, जिथे तिने शाळेच्या फ्रेशर्स नाईट फेअरवेल पार्टीमध्ये मॉडेलिंग केले होते. मॉडेलिंगची आवड असल्याने तिने शाळेत जाणे सोडून दिले. हे जेव्हा तिच्या वडिलांना हे कळले, तेव्हा त्यांनी तिला खूप मारहाण केली. तरीही, अभिनेत्री बनण्याचा तिचा दृढनिश्चय होता आणि वयाच्या व्या वर्षी तिने घर सोडले.
कंगना रणौतने आपल्या अभिनयची सुरुवात अस्मिता थिएटर ग्रुपमधून केली.तर तिने प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक अरविंद गौर यांच्याकडून अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. तिचे पहिले नाटक गिरीश कर्नाड यांचे ‘रक्त कल्याण’ होते. तसेच नंतर कालांतराने ती मुंबईमध्ये आली आणि अनेक चित्रपटांमधून उत्तम कामगिरी करून तिने स्वतःला सिद्ध केले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
मराठमोळा शिव ठाकरे ठरला ‘The 50’ रिअलिटी शो चा महाविजेता










