Friday, December 27, 2024
[aioseo_breadcrumbs]

तुनिषा आत्म’हत्या प्रकरणाला वेगळे वळण; अभिनेत्रीचे काका म्हणाले, ‘100 टक्के लव्ह जिहाद…’

कलाकार येतात- जातात, पण जाणारा कोण असतो हे सर्वात महत्त्वाचे असते. त्या व्यक्तीच्या जाण्याने कुटुंबासोबतच त्याच्या चाहत्यांमध्ये आणि संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये दु:खाचा डोंगर कोसळतो. असेच काहीसे टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हिच्याबाबत घडले. तुनिषाने आत्म’हत्या करत आयुष्य कायमचे संपवले. आता तिच्या निधनानंतर तिच्याबाबत सातत्याने नवनवीन खुलासे होत असल्याचे दिसत आहे. या सर्वांमध्ये आता तुनिषाचे काका पवन शर्मा यांनी खळबळजनक भाष्य केले आहे.

पवन शर्मा (Pawan Sharma) यांच्या मते, पोलिसांनी या प्रकरणी लव्ह जिहाद (Love Jihad) याची कसून चौकशी केली पाहिजे. अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) हिच्या काकांनी दावा केला आहे की, तिचे निधन लव्ह जिहादमुळे झाले आहे. खरं तर, तुनिषाच्या आत्म’हत्येनंतर तिचा सहकलाकार शीजान मोहम्मद खान (Sheezan Mohammed Khan) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tunisha Sharma (@_tunisha.sharma_)

तुनिषाच्या काकांचे खळबळजनक भाष्य
तुनिषा आत्म’हत्येप्रकरणी तिच्या काकांनी केलेल्या खळबळजनक भाष्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे. माध्यमांशी बोलताना पवन म्हणाले की, “मला वाटते की, हे 100 टक्के लव्ह जिहादचे प्रकरण आहे. माझी इच्छा आहे की, पोलिसांनी याची व्यवस्थित चौकशी करावी. इतकेच नाही, तर पोलिसांनी वेगळ्या प्रकारे याची संपूर्ण चौकशी केली पाहिजे. आम्हाला माहिती नाही की, ही आत्म’हत्या आहे की, इतर काही. आमच्याकडे कोणताही व्हिडिओ रेकॉर्डिंग नाहीये.”

पवन शर्मा यांनी पोलिसांबद्दलही प्रश्न उपस्थित करत म्हटले आहे की, “पोलीस प्रशासन या प्रकरणाला आत्म’हत्या म्हणत आहे. आधी पोलिसांनी या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली पाहिजे. त्यानंतर याला आत्म’हत्या किंवा इतर काही म्हटले पाहिजे. माझा असा अंदाज आहे की, पोलिसांनी अजूनही आमच्या कुटुंबातील कुणाचाही जबाब नोंदवला नाहीये.”

पोलिसांनी नाकारला होता लव्ह जिहादचा मुद्दा
तुनिषा शर्मा आत्म’हत्या (Tunisha Sharma Suicide) प्रकरणाबाबत तिचा एक्स बॉयफ्रेंड आणि सहकलाकार शीजान मोहम्मद खान याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. यादरम्यान एका पोलीस अधिकाऱ्याने चौकशीनंतर सांगितले की, तुनिषा शर्मा आत्म’हत्या प्रकरणाशी लव्ह जिहादचा कोणताही संबंध नाहीये. वैद्यकीय अहवालात सांगण्यात आले आहे की, अभिनेत्रीचे निधन फाशी घेतल्यामुळे झाले आहे.

वयाच्या 20व्या वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या तुनिषा शर्मामुळे टीव्ही इंडस्ट्रीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. (actress tunisha sharma uncle claims her death reason love jihad sheezan khan read more)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
मुकेश खन्ना यांनी तुनिषा शर्माच्या कुटुंबावर काढला राग; म्हणाले, ‘सर्वात मोठे दोषी मुलींचे…’
तुनिषा शर्माचा अंत्यसंस्कार करण्यापूर्वी अभिनेत्रीची आई झाली बेशुद्ध, वाचा लेटेस्ट अपडेट

हे देखील वाचा