तिन्ही खानसोबत काम करूनही यश न मिळालेल्या ट्विंकल खन्नाबाबत ज्योतिषाने केली होती ‘ही’ भविष्यवाणी


अभिनेत्री म्हणून ट्विंकल खन्नाने भलेही विशेष काही मिळवले नसेल, पण लेखिका म्हणून ती नक्कीच यशस्वी ठरली आहे. ट्विंकल ही काही वर्षांपूर्वीपर्यंत अक्षय कुमारची पत्नी आणि दिग्गज अभिनेते राजेश खन्ना यांची मुलगी म्हणून ओळखली जात होती. राजेश आणि डिंपल कपाडिया यांची मुलगी असल्याने तिला भविष्यातील सुपरस्टार म्हणून ओळखले जात होते, परंतु प्रत्यक्षात काहीतरी वेगळेच झाले. मात्र, ट्विंकलने अनेक सुपरस्टार कलाकारांसोबत काम केले. शिवाय ती तिन्ही खानांची नायिका राहिली आहे. ट्विंकल बुधवारी (२९ डिसेंबर) तिचा ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्याबद्दल अधिक माहिती.

ट्विंकल (Twinkle Khanna) आणि अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) जुन्या फोटोशूटचा हा फोटो आहे. तिने २००१ मध्ये अक्षय कुमारसोबत लग्न केले. ट्विंकल ही अशा अभिनेत्रींपैकी एक आहे जिने तिन्ही खानसोबत चित्रपट केले आहेत. आमिर खानसोबतचा ‘मेला’ असो, शाहरुखसोबतचा ‘बादशाह’ असो किंवा सलमानसोबतचा ‘जब प्यार किसी से होता है’, मात्र यातील एकही चित्रपट हिट झाला नाही.

ट्विंकलने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला अक्षय कुमारसोबत लग्न करायचे नव्हते, फक्त अफेअर करायचे होते. पण चेष्टा करत सुरू झालेल्या अफेअरचे रुपांतर लग्नात झाले. आज ट्विंकल खन्ना एक लेखिका आहे. ती वर्तमानपत्रात कॉलमही लिहिते आणि ट्विटरवर तिचे ट्वीटही खूप मजेदार असतात आणि कधी कधी तिला ट्रोल केले जाते. ती ट्विटरवर ‘मिसेस फनीबोन्स’ म्हणून ओळखली जाते.

ट्विंकल नेहमीच खूप सुंदर दिसायची आणि आता तिने लेखक आणि निर्माती म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तिने स्वतःची वेबसाइट देखील सुरू केली आहे आणि ती अनेक लोकप्रिय व्यक्तींच्या मुलाखती देखील करते.

ट्विंकलने जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) यांच्याशी संवाद साधताना तिच्या आणि अक्षयच्या लग्नाबद्दल एक किस्सा देखील शेअर केला होता. त्यावेळी ट्विंकल म्हणाली की, “वडिलांकडे एका ज्योतिषी आले आणि त्यांनी सांगितले की, तुमची मुलगी अक्षय कुमारशी लग्न करेल. तेव्हा मी अक्षयला ओळखतही नव्हते.” ट्विंकल म्हणाली की, लग्नानंतर राजेश खन्ना (Rajesh Khanna) याच ज्योतिषीला त्यांच्यासोबत घरी घेऊन आले होते. तिथे त्यांनी भविष्याविषयी सांगितले होते की, अभिनेत्री लेखिका होणार आहे. ट्विंकलने सांगितले की, तिने २० वर्षांपासून काहीही लिहिले नाही आणि ज्योतिष हे लेखक होण्याबद्दल बोलत होते. “मला वाटले ती व्यक्ती पकवत होती, पण आता पाहा.”

ट्विंकल खन्नाने १७ जानेवारी २००१ रोजी अक्षय कुमारसोबत लग्न केले होते. या जोडप्याच्या लग्नाला २० वर्षे झाली आहेत. दोघेही. बॉलिवूडच्या परफेक्ट जोडप्यांपैकी एक आहे. फिल्मफेअरच्या एका फोटोशूटदरम्यान दोघांची भेट झाली होती. इथून दोघांमध्ये जवळीक वाढली. आज या दोघांना मुलगा आरव आणि मुलगी नितारा अशी दोन मुले आहेत.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!