Tuesday, July 9, 2024

‘सत्यानाश, ओढणी तर घ्यायची मॅडम’, गणरायासमोर पोझ देणारी उर्फी जावेद नेटकऱ्यांकडून ट्रोल

लोकप्रिय रियॅलिटी शो ‘बिग बॉस ओटीटी’ यामध्ये सहभागी झालेली उर्फी जावेद दररोज चर्चेत असते. टीव्ही स्टार असण्याव्यतिरिक्त उर्फी ही सोशल मीडियावर चर्चेत असलेले एक मोठे नाव आहे. तिच्या बिनधास्त अंदाजामुळे ती नेहमीच चर्चेत राहते. याच दरम्यान, उर्फीवर पुन्हा एकदा टीकाकारांनी निशाणा साधला आहे. खरं तर, शुक्रवारी (१० सप्टेंबर) गणेश उत्सवानिमित्त टीव्ही आणि चित्रपट जगतातील अनेक कलाकार घरी बाप्पाचे स्वागत करत आहेत. याच दरम्यान, उर्फी जावेद देखील गणपतीच्या भक्तीमध्ये तल्लीन झाल्याचे दिसून आले.

घरी गणपतीच्या मूर्तीसोबत पोझ देताना उर्फीने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. गणपती स्थापनेचे फोटो पोस्ट करताना उर्फीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “माझ्या घरी पहिला गणपती, गणपती बाप्पा मोरया.” सोशल मीडियावर उर्फीचे फोटो पोस्ट होताच युजर्सने तिला ट्रोल करायला सुरुवात केली. (Actress Urfi Javed Bad Trapped Posted Picture of Ganpati Establishment On Social Media)

उर्फीच्या पोस्टवर तिचे चाहते खूप कमेंट करत आहेत. काही लोकांना तिचे हे फोटो आवडले, तर काहींनी तिला तिच्या कपड्यांबद्दल ट्रोल करायला सुरुवात केली. उर्फीच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना एका युजरने लिहिले की, “सत्यानाश, गणपती बाप्पासमोर पोझ देत आहे आणि ओढणी तर घ्यायची मॅडम.” उर्फी अशाप्रकारे ट्रोल होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही तिला तिच्या कपड्यांमुळे ट्रोल केले गेले होते.

यापूर्वी उर्फी विमानतळावर तिच्या लूकमुळे चर्चेत होती. यादरम्यान तो रिव्हिलिंग लूकमध्ये दिसली. तिने निळ्या रंगाची जीन्स घातली होती. तसेच तिने निळ्या रंगाचे जॅकेट आणि उंच वेणी सुद्धा घातली होती. उर्फीचे जॅकेट समोरून फाटले होते आणि इतके फाटले होते की, तिचा आतील पोशाख दिसत होता. उर्फी जावेदचा हा लूक पाहिल्यानंतर तिला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले. तिला ट्रोल करताना लोकांनी तिला नवीन कपडे खरेदी करण्याचा सल्लाही दिला.

त्याचवेळी ट्रोल झाल्यावर उर्फी म्हणाली होती की, “जर मला प्रसिद्धी हवी असती, तर मी कपड्यांशिवाय विमानतळावर आले असते.” उर्फी आपली नाराजी व्यक्त करत म्हणाली की, “मी माझ्या कपड्यांपेक्षा जास्त आहे. लोक फक्त माझ्याबद्दल का बोलत नाहीत? मला समजले आहे की, मी काहीही पोस्ट किंवा बोलले तरीही लोक काही ना काही बोलतातच. मी बिकिनी घातली किंवा सलवार सूट घातला, फक्त अशा कमेंट्स ऐकायला मिळतात.”

अभिनेत्री उर्फी जावेदचा ‘बिग बॉस ओटीटी’ शोमध्ये स्पर्धक म्हणून तिचा प्रवास लवकरच संपला. उर्फी बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी सतत जोडलेली असते. उर्फीचे सोशल मीडियावर प्रचंड चाहते आहेत. इंस्टाग्रामवर उर्फीचे १.५ मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काळजाचा ठोका चुकवणारी बातमी! चिरंजीवीचा भाचा अन् अभिनेता साई धरम तेजचा अपघात; आता कशीय तब्येत?

-बापरे! ‘भूल भुलैया २’ शूटिंग दरम्यान कार्तिक आर्यनसोबत घडली ‘ही’ घटना, सर्वजण गेले घाबरून

-दान देताना फोटो काढणाऱ्या कलाकारांवर भडकला रोहित शेट्टी; म्हणाला, ‘फोन करून बोलवल्याशिवाय…’

हे देखील वाचा