Saturday, July 6, 2024

बोल्ड लूकने आग लावणाऱ्या उर्फीने, अभिनेत्री होण्यापूर्वी केलंय ‘हेही’ काम, वाचा तिच्याबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी

‘बिग बॉस ओटीटी’ मधून प्रसिद्धीच्या झोतात आलेली आणि सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री उर्फी जावेद शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) आपला २५ वा वाढदिवस साजरा करत आहे. उर्फी जावेद तिच्या फॅशन सेन्समुळे अनेकदा चर्चेत असते. ती कधी विमानतळावर ब्रासह डेनिम घालून जाताना दिसते. तर कधी बॅकलेस ड्रेस परिधान करून चर्चेत राहते. आज आपण तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्याबद्दल काही गोष्टी जाणून घेऊया.

‘बिग बॉस ओटीटी’वर धमाल करणारी उर्फी जावेद सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. शो सोडल्यानंतरही उर्फी अनेकदा तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत राहते. अलीकडेच ती विमानतळावर दिसली होती. अशावेळी पॅपराझी तिचे फोटो काढण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. उर्फी देखील त्यांना पोझ देणे थांबवत नाही. उर्फीचे अनेक बोल्ड नेहमीच फोटो इंटरनेटचा पारा उंचावत असतात.

नेहमीच आपल्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत राहणाऱ्या उर्फीचा जन्म १५ ऑक्टोबर १९९६ मध्ये लखनऊ येथे झाला होता. तिने तिचे शिक्षण लखनऊमध्येच पूर्ण केले. उर्फीने मास कम्युनिकेशनमधून आपले ग्रॅज्युएशन पुर्ण केले आहे. लहानपणापासूनच तिला अभिनय आणि डान्सची आवड होती.

उर्फीने तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबई गाठली. तिने आतापर्यंत अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे. उर्फीने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात टीव्ही शो ‘डेढ़ी-मेढ़ी फॅमिली’ मधून केली. मुंबईत येण्यापूर्वी उर्फीने काही दिवस दिल्लीतील एका कंपनीत सहाय्यक व्यवस्थापक म्हणूनही काम केले आहे. फार कमी लोकांना माहित आहे की, उर्फी एक उत्तम गायिका आहे. तिला रॅप करायला खूप आवडते.

उर्फी जावेद तिच्या फिटनेसबाबत खूप जागरूक आहे. ती अनेकदा आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फिटनेसशी संबंधित व्हिडिओ पोस्ट करत असते. उर्फी जावेदने बिग बॉस ओटीटीमध्येही भाग घेतला होता, परंतु तिने मधेच हा शो सोडला.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर ती बिग बॉस ओटीटीचा भाग बनली होती. पण ती ८ व्या दिवशी बेदखल झाली. याशिवाय, ‘चंद्र नंदिनी’, ‘मेरी दुर्गा’, ‘बेपनाह’, ‘जीजी मां’ आणि ‘डायन’ सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी घालते तेव्हा चिप आणि स्टारकिड्स घालतात तेव्हा… हा भेदभाव आहे’, उर्फीचे ट्रोलर्सला सणसणीत उत्तर

-‘पब्लिसिटीसाठी ही नग्नदेखील होईल’, उर्फी जावेदचा बोल्ड लूक पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल

-जीन्ससोबत उर्फीने फक्त ब्रालेट केली परिधान, बोल्ड फोटोत दिसलं असं काही की, नेटकरी म्हणाले…

हे देखील वाचा