Tuesday, December 24, 2024
[aioseo_breadcrumbs]

चिंता कशाची! उर्फी पॅपराजीला म्हणाली, ‘माझ्या आयुष्याच…’

अभिनेत्री उर्फी जावेद नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत येत असते. आपल्या हटके स्टाईलने लाेकांचे लक्ष वेधनारी आणि नेहमी चेहऱ्यावर स्मित घेऊन फिरणारी उर्फी सध्या चांगलीच नाराज दिसत आहे. उर्फीचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हारल होत आहे, ज्यामध्ये ती गोल्डन कलरचा सुपर ट्रान्सपरंट स्कर्ट आणि मॅचिंग ब्रॅलेटमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये उर्फी आपली अवस्था सांगताना दिसत आहे.

व्हिडिओच्या सुरुवातीला उर्फी हसताना दिसत आहे आणि नंतर म्हणते, “अरे मला माहित नाही काय चालले आहे. मी वाट पाहिली आहे. मी काय – काय सांगू की, काय झालंय.” इतक्यात एका पॅपराजीने उर्फीला विचारलं की, “पार्टीत बोलावतेय का?” प्रत्युत्तरात देत उर्फी म्हणाली,”का? नाही बोलावणार, तुमच्याशिवाय पार्टी होणार आहे का?” यानंतर उर्फी ‘क्वीन’ चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉगही बोलते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

उर्फीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक युजर्स एकच प्रश्न विचारत आहेत की, “अखेर असे काय झाले, ज्यामुळे तिचे आयुष्य खराब झाले.” त्याचवेळी, चाहत्यांना याचं ही आश्चर्य वाटत आहे की, यावेळी अभिनेत्री विमानतळावर नसून इतर ठिकाणी स्पॉट झाली आहे. अनेकांनी यावर देखील अभिनेत्रीला प्रश्न विचारला आहे.

साजिद खान यांच्याबद्दलच्या वक्तव्यामुळे उर्फी आलेत चर्चेत
अलीकडे, उर्फी दिग्दर्शक आणि ‘बिग बॉस 16’ चा स्पर्धक साजिद खान यांच्याबद्दलच्या वक्तव्यामुळे चर्चेत होती.
नुकताच उर्फीचा एक व्हिडिओ समोर आला हाेता, ज्यामध्ये ती म्हणते, “मी तुम्हा सर्वांना आठवण करून देऊ इच्छितो की, साजिद खानने कधीही कोणाचीही माफी मागितली नाही, विशेषतः त्यांची, ज्यांचे त्याने शोषण केले. आता केवळ तो स्वतःचा बचाव करत आहेत. त्याने कधीही माफी मागितली नाही. कधीही नाही तो फक्त स्वतःचे संरक्षण करत आहे.”

उर्फी असते ड्रेसिंग स्टाईलमुळे चर्चेत
उर्फी जावेद जर सर्वाधित चर्चेत राहिली, तर ती आहे तिची ड्रेसिंग स्टाईलमुळे. तिच्या विचित्र ड्रेसेजमुळे ती सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. उर्फी काेणत्याही वस्तूपासून बनवलेला ड्रेस घालू शकते. गुलाबाच्या पाखळ्या, घड्याळ,  सिमकार्ड, पॉलिथिन अशा सर्व गोष्टींनी बनवलेले कपडे उर्फी परिधान करते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
स्ट्रगलर असणाऱ्या अमिताभ बच्चन यांच्या प्रेमात वेड्या झाल्या होत्या जया भादुरी, अशी होती प्रेमकहाणी

अमिताभ बच्चनच्या ‘या’ चित्रपटासाठी लागली होती मैल मैलांची रांग, चाहत्यांनी वेडे होऊन केली होती गर्दी

हे देखील वाचा