Monday, July 21, 2025
Home बॉलीवूड Bigg Boss OTT: उर्फी जावेदने वैयक्तिक आयुष्याबद्दल केला मोठा खुलासा; म्हणाली, ‘वडील शोषण करायचे आणि…’

Bigg Boss OTT: उर्फी जावेदने वैयक्तिक आयुष्याबद्दल केला मोठा खुलासा; म्हणाली, ‘वडील शोषण करायचे आणि…’

‘बिग बॉस ओटीटी’ची पहिली एलिमिनेशन फेरी मागील आठवड्यात म्हणजे १५ ऑगस्ट रोजी होती. शोमधील तीन शिलेदार म्हणजे राकेश बिपट, शमिता शेट्टी आणि उर्फी जावेद यांना पहिल्या फेरीतून बाहेर पडण्यासाठी नामांकित करण्यात आले होते. या दरम्यान तिन्ही स्पर्धक नाराज दिसत होते. तसेच उर्फी जावेदचा प्रवास या शोमध्ये इथेच थांबला आहे.

उर्फी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसते. तिच्या अभिनयाच्या जोरावर तिने सर्व चाहत्यांचे मन जिंकले आहे. बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या आठवड्यात बेघर झाल्यानंतर, तिने तिच्या वैयक्तिक जीवन प्रवासाबद्दल मोठा खुलासा केला आहे. उर्फीने तिच्या अभिनेत्री होण्याच्या निर्णयाबद्दल सांगितले की, तिच्यासाठी टीव्ही इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकणे किती कठीण होते. कारण, तिच्या कुटुंबातील सदस्यांनी तिला कठीण काळात अजिबात साथ दिली नाही.

नुकत्याच एका मुलाखतीत उर्फीने सांगितले की, अभिनेत्री होण्यासाठी तिने खूप संघर्ष केला आहे. घरी कुटूंबासोबत राहूनही प्रेमळ आठवणी न मिळाल्याचे दुःख काही वेगळंच असते. उर्फी सांगते की, जेव्हा ती फक्त एक शाळकरी मुलगी होती, तेव्हा काही लोकांनी तिचे फोटो प्रौढ वेबसाइटवर प्रसारित केले होते. ज्याबद्दल तिचे पालक आणि नातेवाईकांनाही कळले होते. त्यावेळी तिच्यावर कठीण काळ आला. त्यानंतर तिच्या कुटुंबातील सदस्यांना तिला पाॅर्न अभिनेत्री असल्याचे वाटू लागले.  तेव्हा कुटुंबातील कोणीही तिच्या पाठीशी उभे राहिले नाही. तर तिच्या वडिलांनीही दोन वर्षे तिचे शारीरिक आणि मानसिक शोषण केले.

वाईट दिवसांच्या आठवणी सांगताना उर्फी म्हणाली की, वर्षानुवर्षे सर्वांनी तिला नावेच ठेवली. ते दिवस तिला आजही आठवतात. तिच्या वडिलांनी सर्वांना सांगितले होते की, मुली स्वत:चे निर्णय स्वत: घेऊ शकत नाहीत. कारण केवळ घरातील पुरुषांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे.  पण, त्याहूनही कठीण म्हणजे घरात कोणीही तिला या कठीण काळात साथ दिली नाही. याउलट तिच्यावर अलेक प्रकारचे आरोप लावले गेले आणि घरात वाईट वागणूक देण्यात आली. यामुळे ती खूप निराश झाली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ब्यूटी क्वीन’ डिंपल हयातीला रवी तेजाने दिले वाढदिवसाचे खास गिफ्ट; शेअर केला आगामी ‘खिलाडी’चा रोमॅंटिक पोस्टर

-खण स्कर्ट घालून रुपाली भोसलेने शेअर केले ‘हटके’ फोटोशूट, मात्र सर्वत्र रंगलीय ड्रेसची चर्चा

-‘ही’ व्यक्ती आहे अंकिता लोखंडेसाठी खूप खास; फोटो शेअर करत म्हणाली, ‘तू माझ्यासाठी…’

हे देखील वाचा