लोकप्रिय रियॅलिटी शो ‘बिग बाॅस ओटीटी’मध्ये सहभागी झालेली उर्फी जावेद सतत चर्चेत असते. टीव्ही स्टार असण्याव्यतिरिक्त उर्फी हे सोशल मीडियावर चर्चेत असलेले एक मोठे नाव आहे. तिच्या बिनधास्त अंदाजामुळे ती नेहमीच चर्चेत असते. अनेकदा ती फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसते. तिच्या बोल्डनेसमुळे नेटकरी अनेकदा तिच्यावर निशाणा साधत असतात. कित्येकदा अभिनेत्रीला ट्रोलर्सशी सामना करावा लागला आहे. अशातच उर्फी स्पॉट झाली आहे. इथे देखील तिची अनोखी ड्रेसिंग स्टाईल पाहायला मिळाली आहे.
उर्फीला पॅपराजींनी स्पॉट केले आहे. या व्हिडिओमध्ये ती फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे. तिने राखाडी रंगाची पँट आणि ब्रा परिधान केली आहे. तसेच या ड्रेसवर तिने लॉन्ग शर्क घातले असून, पायात हाय हिल्स घातले आहेत. तिने केसांची वेणी घातली आहे, आणि एका हातात मास्क आणि मोबाईल घेऊन ती पोझ देताना दिसते. या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला ‘काटा लगा’ हे गाणे लागले आहे. हा व्हिडिओ व्हायरल भयानी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.
तिच्या या व्हिडिओवर अनेकजण कमेंट करत आहेत. यावेळी देखील अनेकजण तिला ड्रेसमुळे ट्रोल करत आहेत. तिच्या या व्हिडिओवर एकाने कमेंट केली आहे की, “हिची रोज वेगळी नाटकं असतात.” तर आणखी एकाने लिहिले आहे की, “फाटलेला ब्लाउज घातलेली गरीब मुलगी आली.” तर आणखी एकाने लिहिले आहे की, “आता हा ड्रेस कोणी बनवला.” अशाप्रकारे तिच्यावर या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रया देताना दिसत आहेत.
उर्फीविषयी बोलायचे झाले, तर अलिकडेच ती ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये झळकली होती. यापूर्वी ती ‘चंद्र नंदिनी’,’ मेरी दुर्गा’, ‘बेपनाह’, ‘जीजी मां और डायन’ या मालिकांमध्ये देखील दिसली आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-उफ्फ ब्यूटी! तेजस्विनीच्या स्टायलिश लूकने इंटरनेटवर लावली आग, बेडवर बसून देतेय फोटोसाठी पोझ
-शाहरुख खान पुन्हा एकदा दिसणार ‘डबल रोल’मध्ये? जाणून घ्या काय आहे आगामी चित्रपटाची कथा
-उर्वशी रौतेलालाही मिळाला दुबईचा गोल्डन व्हिसा, फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद