Monday, April 21, 2025
Home अन्य नवीन वर्षात उर्फी जावेदचा सिंपल लूक! फॅशनने नाही, तर कॅप्शनने केले सर्वांनाच आश्चर्यचकित

नवीन वर्षात उर्फी जावेदचा सिंपल लूक! फॅशनने नाही, तर कॅप्शनने केले सर्वांनाच आश्चर्यचकित

अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) तिच्या अतरंगी फॅशनमुळे आणि तिचा विचित्र लूकमुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते. ती तिच्या हटके स्टाईलने संपूर्ण सोशल मीडियाचे लक्ष वेधून घेत असते. उर्फीचे विविध ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर सतत धुमाकूळ घालत असतात. उर्फीचा क्वचितच असा फोटो असेल की, ज्यामुळे उर्फी चर्चेचा विषय बनली नाही. २०२१ मध्ये तिला मिळालेली लोकप्रियता कदाचित तिला कधीच मिळाली असती. जर तिला बिग बॉस ओटीटीसारखे मोठे व्यासपीठ मिळाले नसते.

याशिवाय उर्फीने सोशल मीडियावर आधीच तिची जबरदस्त फॅन फॉलोविंग बनवली आहे. ती सतत तिच्या नवनवीन लूकचे फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते, जे पाहून चाहते देखील थक्क होतात. उर्फीची बोल्ड स्टाईल आणि अनोखी फॅशन सेन्स इतरांपेक्षा वेगळी आहे. अलिकडेच, नवीन वर्षाच्या निमित्ताने अभिनेत्रीने तिचे नवीनतम फोटो शेअर केले आहेत आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

या फोटोंमध्ये उर्फी खूपच सुंदर दिसत आहे. तिने काळ्या रंगाचा ड्रेस कॅरी केला आहे आणि त्यावर बदामी रंगाचा ब्लेझरही परिधान केला आहे. तिने ॲक्सेसरीज देखील कॅरी केल्या आहेत. ज्या तिच्या लूकला पूरक आहेत. फुलं आणि झाडांमुळे उर्फीचा लूक खूपच सुंदर आहे. तिने फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, “तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. ही पोस्ट लाईक करा आणि तुमचे वर्ष खूप छान जाईल, जर तुम्ही या पोस्टकडे दुर्लक्ष केले, तर तुमचे काहीतरी वाईट होईल. आता रिस्क न घेणे तुमच्यावर अवलंबून आहे.”

उर्फीजी सहसा तिच्या पोशाखामुळे चर्चेत असते, तिला नवीन वर्षात साध्या आणि सुंदर लूकमध्ये पाहून चाहते आनंदी आहेत. सगळेच तिचे कौतुक करताना दिसत आहेत. चाहते हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत आणि तिला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत.

काही काळापूर्वी उर्फीने आपल्या विचित्र फॅशन सेन्सने चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते. ती अशा पोशाखात दिसली, की पाहून असे वाटत होते की, तिचे कपडे फारच फाटले आहे. पण असे काही नव्हते, तर कपड्यांची डिझाईनच तशी होती. यावरून तिला खूप ट्रोल करण्यात आले.

हेही वाचा-

हे देखील वाचा