Wednesday, July 16, 2025
Home टेलिव्हिजन उर्फी जावेदने परिधान केला विचित्र कटआउट ड्रेस, युजर म्हणाले ‘खिडकीचा पडदा लावून आली’

उर्फी जावेदने परिधान केला विचित्र कटआउट ड्रेस, युजर म्हणाले ‘खिडकीचा पडदा लावून आली’

बिग बॉस ओटीटीमध्ये दिसलेली अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या जबरदस्त फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. उर्फी सतत तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आजकाल ती तिच्या अभिनयासाठी कमी आणि तिच्या विचित्र कपड्यांसाठी जास्त ओळखली जाते. ती कुठेही जाते, जे काही करते ते सर्व पॅपराझीच्या कॅमेऱ्यात कैद होते. उर्फी पुन्हा एकदा तिच्या विचित्र पोशाखासह परतली आहे. या संदर्भात उर्फीने गुलाबी रंगाचा कटआउट ड्रेस परिधान केला आहे, ज्याने चाहत्यांचे होश उडवले आहे. सतत विचित्र कपडे परिधान करून मुंबईच्या रस्त्यांवर फिरणाऱ्या उर्फीच्या या आउटफिटबद्दल खूप काही ऐकायला मिळत आहे.

उर्फी (Urfi Javed) या गुलाबी रंगाच्या कटआउट ड्रेसमध्ये मुंबईत दिसली. डीप नेकलाइन, विचित्र कट्स आणि नॉट्स असलेला ड्रेस परिधान करून उर्फी जावेद जबरदस्त स्टाईलने फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे. यासोबतच तिचे अनेक व्हिडिओही व्हायरल होत आहेत.

उर्फी जावेदने या ड्रेससोबत व्हाईट हील्स घातले आहेत. इतर आउटफिट्सप्रमाणेच या लूकचीही सोशल मीडिया युजर्सकडून खिल्ली उडवली जात आहे. काहींनी उर्फीची कीव येत असल्याचे सांगितले, तर काहींनी या ड्रेसला पूर्णपणे बिनडोक आणि भंगार म्हटले आहे.

एका युजरने लिहिले की, “कदाचित तिची मानसिक स्थिती ठीक नसेल.” आणखी एका युजरने लिहिले, “आता दया येते, गरीब.” एका युजरने तर उर्फीला पृथ्वीवरचे ओझे असल्याचे म्हटले. तर आणखी एका युजरने लिहिले की, “खिडकीचा पडदा लावून आली आहे.” दुसर्‍याने लिहिले, “हिला मेंटल हॉस्पिलमध्ये ठेवा.”

काही युजर्स उर्फीच्या डिझायनर आणि स्टायलिस्टकडेही बोट दाखवत आहेत. ते म्हणतात की, हा परिधान करण्यासारखा ड्रेस नाही. तसे, याआधीही उर्फी जावेदने तिच्या लूकबद्दल बरेच काही ऐकले आहे. काही दिवसांपूर्वी उर्फीने निळ्या रंगाची साडी परिधान करून फोटोशूट केले होते. या साडीसोबत तिने ब्लाउज घातला नव्हता. त्याआधी उर्फी जावेद ऑल ब्लॅक आउटफिटमध्ये दिसली होती. उर्फीने या आउटफिटसोबत हाय हिल्स घातला, ज्यामध्ये ती पडता-पडता वाचली होती.

उर्फीने या महिन्याच्या सुरुवातीला चाहत्यांची तिच्या कुटुंबाशी ओळख करून दिली होती. तिने सांगितले की, तिला एक मोठी बहीण आणि तीन लहान बहिणी आणि एक भाऊ आहे. सर्वांचे पालनपोषण उर्फीची आई झाकिया सुल्ताना यांनी केले आहे.

उर्फी शेवटची बिग बॉस ओटीटीमध्ये दिसली होती. येथून तिला ओळख मिळाली. तसे, उर्फी ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘चंद्रा नंदिनी’, ‘कसौटी जिंदगी की’, ‘ए मेरे हमसफर’, ‘डायन’ आणि ‘बेपनाह’ यांसारख्या मालिकांमध्ये दिसली आहे.

हेही वाचा –

 

हे देखील वाचा