Wednesday, July 3, 2024

एका धाग्यावर टिकलाय उर्फीचा हॉट टॉप; जराशी केली गडबड, तर तिलाही होईल पश्चाताप

कलाविश्वातील प्रसिद्धी पिपासू अभिनेत्रींमध्ये उर्फी जावेद हिचाही समावेश होतो. उर्फीला नेटकऱ्यांचे लक्ष कसे वेधून घ्यायचे हे चांगलेच माहिती आहे. ती तिच्या अभिनयाव्यतिरिक्त तिच्या फॅशन सेन्समुळे तुफान चर्चेत असते. ती दरदिवशी कोणते ना कोणते प्रयोग करताना दिसते. काहीवेळा तिचे हे प्रयोग इतके भयंकर असतात की, सामान्य व्यक्ती असा प्रयोग करणारही नाहीत. काही दिवसांपूर्वी उर्फीने शरीरावर थेट ब्लेड चिटकवले होते. मात्र, आता तिचा असा एक लूक समोर आला आहे, जो पाहून प्रत्येकाच्या भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाहीत.

एका धाग्यावर लटकला होता उर्फीचा टॉप
अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) हिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती नारंगी रंगाच्या टॉपमध्ये दिसत आहे. उर्फी एका गाण्यावर काहीतरी कृती करताना दिसत आहे. तिच्या लूकबद्दल बोलायचं झालं, तर तिने समोरून उघडा असलेला टॉप परिधान केला आहे, जो फक्त एका धाग्याने बांधला गेला आहे. तिने तिचे केस बांधले आहेत आणि तिच्या अदांनी ती समोरच्याला भुरळ घालत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

ब्लेडच्या ड्रेसमध्ये झळकली होती उर्फी
नुकताच उर्फीचा एक भयंकर लूक समोर आला होता. यावेळी तिने रेजरचे ब्लेड एकत्र करत एक ड्रेस तयार केला होता. या ड्रेसमध्ये उर्फी खूपच सुंदर दिसत होती. ती या ड्रेसमध्ये जेवढी सुंदर दिसत होती, तेवढाच खतरनाक ड्रेसही होता. खरं तर, छोटीशी चूकदेखील तिच्या शरीराला इजा करू शकत होती. उर्फीने कपड्यांच्यावर ब्लेडला धाग्यांच्या मदतीने लावले होते. तिचा हा जबरदस्त लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

प्रयोगप्रिय आहे उर्फी
उर्फीने शेअर केलेली प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर आग लागलेल्या वणव्यासारखी पसरत असते. तिच्या अधिकतर पोस्ट या माधम्यांमध्ये झळकत असतात. तसेच, ती नवनवीन प्रयोग करत असते. ती नेहमीच तिच्या विचित्र फोटोशूटमुळेही चर्चेत असते. तिला इंस्टाग्रामवर ३३ लाखांहून अधिक फॉलोव्हर्स आहेत. यामुळे तिच्या प्रत्येक पोस्टवर लाखो लाईक्सचा वर्षाव होत असतो.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

अर्रर्र! लग्नाच्या आधीच लागली हार्दिक अन् अक्षयाची भांडणं, लंडनच्या रस्त्यांवरच अभिनेत्रीने धरली कॉलर

मल्लिका शेरावतने ‘मर्डर’ चित्रपटाची केली दीपिकाच्या ‘गेहराइया’शी तुलना; म्हणाली मी 15 वर्षांपूर्वी हेचं केलं होतं’

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरला नीतू कपूर देत नाही सल्ला, स्वतः सांगितले कारण..

हे देखील वाचा