Friday, April 25, 2025
Home मराठी उर्मिला कोठारेच्या गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील फोटोंनी चाहत्यांना भुरळ, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

उर्मिला कोठारेच्या गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील फोटोंनी चाहत्यांना भुरळ, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

मराठीत चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि डान्सर उर्मिला कोठारे ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते. लहानपणापासून उर्मिलाला डान्सची प्रचंड आवड आहे. मोठी झाल्यावरही तिने डान्ससोबत अभिनयाचे करिअर निवडले. ती तिचे अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अवघ्या काही कालावधीतच तिच्या या डान्स व्हिडिओला प्रसिद्धी देखील मिळते. अनेकवेळा ती तिच्या मुलीला देखील डान्स शिकवताना दिसते. अशातच उर्मिलाचा एक फोटो समोर आला आहे.

उर्मिलाने अलीकडेच सोशल मीडियावर तिचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने गुलाबी रंगाचा एक सुंदर ड्रेस घातला आहे. या ड्रेसवर तिने कर्ली हेअर केले आहेत. तसेच पायात पांढऱ्या रंगाचे हील्स घातले आहेत. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (Actress urmila kothare share her photos on social media)

तिच्या चाहत्यांना देखील तिचा हा लूक फार आवडला आहे. या फोटोवर आदित्य सरपोतदार याने “स्टनिंग,” अशी कमेंट केली आहे. तसेच फुलवा खामकरने “लव्हली पिक,” अशी कमेंट केली आहे. यासोबतच तिचे चाहते देखील या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

अभिनेत्री उर्मिला कोठारेने अनेक मराठी चित्रपटात तसेच हिंदी मालिकामध्ये काम केले आहे. तिने मराठीमध्ये ‘दुनियादारी’, ‘शुभमंगल सावधान’, ‘ती सध्या काय करते’, ‘गुरू’, ‘काकन’, ‘प्यार वाली लव्ह स्टोरी’ यासारख्या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘मायका’ आणि ‘मेरा ससुराल’ या हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे. उर्मिलाचे लग्न मराठीत चित्रपटसृष्टीतील दिग्गज निर्माते आणि अभिनेते महेश कोठारे यांचा मुलगा आदिनाथ कोठारे याच्यासोबत झाले आहे. आदिनाथ देखील एक कमालीचा अभिनेता आहे. उर्मिला आणि आदिनाथने ‘दुभंग’, ‘अनवट’ या चित्रपटात एकत्र काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मिठीत जाऊन तुझ्या मिटावे…’, स्पृहा जोशीच्या फोटोसोबत कॅप्शननेही वेधले चाहत्यांचे लक्ष

-देखणं रूप! हिरव्या बांगड्या, कपाळावर टिकली अन् पिवळी साडी नेसून राजेश्वरीने दिल्या नवरात्रीच्या शुभेच्छा

-बोल्ड ऍंड ब्यूटीफुल! सई ताम्हणकरच्या हॉटनेसने नेटकरी झाले पुरते वेडे; फोटोवर पडतोय लाईक्सचा पाऊस

हे देखील वाचा